मुंबई विद्यापीठाच्या बी.एस्सी. सत्र ५ परीक्षेचा निकाल निर्धारित वेळेत जाहीर

Mumbai University Results 2023-24 : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या अंतिम वर्षाच्या ऑक्टोबर २०२३ मध्ये संपन्न झालेल्या हिवाळी सत्राच्या विज्ञान विद्याशाखेच्या तृतीय वर्ष बीएस्सी सत्र ५ या परीक्षेचा निकाल निर्धारित वेळेत जाहीर करण्यात आला आहे. या निकालाबरोबर पदवीचे महत्वाचे निकाल विद्यापीठाने निर्धारित वेळेत जाहीर केले आहेत.

बीएस्सी सत्र ५ च्या परीक्षेमध्ये एकूण ३२९८ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ८ हजार ६५३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ हजार २५२ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ (Appeared) झाले होते. तर ४०१ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ४९४२ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. तसेच या परीक्षेत १२ कॉपी केसेस झाल्या आहेत. बीएस्सी सत्र ५ चा निकाल ४०.०२ टक्के लागला आहे.

या परीक्षेत अचूकतेसाठी स्टिकर व ऑनलाईन उपस्थिती पद्धत यशस्वी झाली असून कोणताही निकाल राखीव ठेवण्यात आलेला नाही असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितले.

३० दिवसाच्या आत बीए, बीकॉम, बीएस्सी निकाल जाहीर :

पारंपरिक अभ्यासक्रम बीए, बीकॉम, बीएस्सी या परीक्षेचे निकाल विद्यापीठाने निर्धारित वेळेत म्हणजे ३० दिवसाच्या आत जाहीर केले आहेत. हे निकाल लवकर जाहीर करण्यासाठी निकाल कक्षाचे उपकुलसचिव नरेंद्र खलाने, मूल्यांकन कक्षाचे उपकुलसचिव संतोष सोनावणे, हस्तलिखित व नियुक्ती कक्षाचे उपकुलसचिव सुनील खतेले व सीसीएफचे सिस्टीम ऑपरेशनस् ऑफिसर प्रवीण म्हात्रे,भास्कर बेंडाळे व डिआयसीटीचे संचालक डॉ. प्रवीण शिनकर या अधिकाऱ्यांनी कार्य केले.

विद्यापीठाने आजपर्यंत २०२४ च्या हिवाळी सत्राचे ३२ निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रदर्शित करण्यात आले आहेत.

Source link

MU Resultsmumbai university exam resultsmumbai university newsmumbai university october exam resultMumbai University Resultmumbai university results 2023-24university of mumbai bsc sem 5 resultsuniversity of mumbai resultमुंबई विद्यापीठ निकालमुंबई विद्यापीठ बीएससी निकाल
Comments (0)
Add Comment