श्रीरामांविषयी वक्तव्य अभ्यासपूर्णच, पण भावना दुखावल्यास खेद, जितेंद्र आव्हाडांनी पुरावे दाखवले

शिर्डी : मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही, पण आजकाल अभ्यासाला नाही भावनांना महत्त्व आहे. जर माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले. प्रभू रामचंद्र मांसाहार करत असल्याचं वक्तव्य केल्यामुळे आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झाला आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरानिमित्त शिर्डीत असलेल्या जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. “प्रभू रामचंद्राबद्दल बोलताना मी म्हटलं की ते मांसाहारी होते. हा वाद मला वाढवायचा नाही, पण जे याविरोधात उभे राहिले, त्यांच्या माहितीसाठी सांगतो, की वाल्मिकी रामायणात सहा कंद आहेत. अयोध्या कंदातील सर्ग २२, ५२ श्लोक १० मध्ये याबाबत उल्लेख आहे” असं म्हणत आव्हाडांनी काही लिखित पुरावे सादर केले.

कुठल्या देवाला मांसाहार प्रिय? कुठे मिळतो सामिष प्रसाद? राम कदम यांची जितेंद्र आव्हाडांच्या अटकेची मागणी
“१८९१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये प्रकाशित झालेली काही कागदपत्रं आहेत. आयआयटीतील विद्यार्थ्यांनी मला काही पेपर पाठवले, इतिहासातील श्लोक आहेत, वाल्मिकी रामायणात जे आहे, त्यावर कोणाचा काही आक्षेप आहे का? १ डिसेंबर २०२३ रोजी अन्नपुराणी नावाचा एक सिनेमा आलाय. त्यात दोन दाक्षिणात्य सुपरस्टारनी काम केलं आहे. वाल्मिकी रामायणातील एक श्लोक त्यात सांगितलाय.” असा दाखलाही जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा, अब्दुल सत्तार संतापले; आक्षेपार्ह भाषेत पोलिसांना लाठीमाराचे आदेश
“कुठलंही भाष्य मी अभ्यासाशिवाय केलं नाही, आजकाल अभ्यासाला नाही, तर भावनांना महत्त्व आहे. त्यामुळे जर माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी कुठल्याही गुन्ह्याला घाबरत नाही, जर कुणाला लॉजिकली बोलायचं असेल तर या” असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर गाठणं आता सोप्पं, कळसूबाईवर जाण्यासाठी आता रोप वेची सुविधा
“आमचा राम सत्यासाठी १४ वर्ष वनवासात गेला होता, तो आम्हा बहुजनांचा आहे, तुम्ही त्याचं अपहरण करता. राम आमच्या हृदयात आहे, फक्त तोंडात नाही. तुम्हाला तुमचा राम निवडणुकांसाठी बाजारात आणायचाय, आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात आहे” असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

प्रभू रामांवर वादग्रस्त विधान, जितेंद्र आव्हाडांच्या खासगी निवासस्थानाबाहेर अजित पवार गट आक्रमक

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Source link

Jitendra Awhadjitendra awhad statementlord ram eat meatजितेंद्र आव्हाडजितेंद्र आव्हाड राम मांसाहारराम कदमराम मंदिरश्रीराम मांसाहार
Comments (0)
Add Comment