या भरतीमध्ये किटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांच्या एकूण २४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच जिल्हा परिषदेने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आही आहे. या पदांनुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून १० जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन याचे सर्व तपशील जाणून घेऊया.
‘राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर, भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
किटकशास्त्रज्ञ – ०६ जागा
सार्वजनिक आरोग्य तज्ञ – ०६ जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – २४ जागा
शैक्षणिक पात्रता –
किटकशास्त्रज्ञ – एमएससी ( M.Sc. Zoology With 5 Year Experience)
सार्वजनिक आरोग्य तज्ञ – वैद्यकीय अभ्यासक्रम पदवीधर (Any Medical Graduate With MPH/ MHA/MBA in Health)
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – डीएमएलटी (12th +DMLT Course)
वेतन –
किटकशास्त्रज्ञ – ४० हजार
सार्वजनिक आरोग्य तज्ञ – ३५ हजार
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १७ हजार
नोकरी ठिकाण – कोल्हापूर
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, (२ रा मजला) आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागाळा पार्क, कोल्हापूर ४१६००३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी २०२४
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘कोल्हापूर जिल्हा परिषद’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता अर्ज प्रक्रियेचे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच १० जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.