सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, जवानाला ८ व्या दिवशी मोठा धक्का बसला. दुसऱ्या गुरुवारी चित्रपटाच्या व्यवसायात २२.४१ टक्क्यांची घट झाली. म्हणजेच सातव्या दिवसाच्या तुलनेत ‘जवान’ची कमाई २३ कोटींवरून १८ कोटींवर घसरली आहे. विशेष म्हणजे प्रेक्षक अजूनही ‘जवान’ सोबतच महिन्याभरा पूर्वी रिलीज झालेल्या सनी देओलचा ‘गदर २’ पाहण्यासही पसंती देत आहेत.
‘जवान’चे आत्तापर्यंतचे एकूण कलेक्शन
‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर एक आठवडा पूर्ण केला आहे. ७ सप्टेंबरला रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या चित्रपटाने या ८ दिवसांत एकूण ३८६.२८ कोटींचा व्यवसाय केला आहे. सर्वाधिक कमाई हिंदीतून झाली आहे. ‘जवान’ने हिंदीमध्ये ३४५.८८ कोटी, तमिळमध्ये २३ कोटी आणि तेलुगूमध्ये १७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
‘जवान’चे जगभरातील कलेक्शन
रेड चिलीज एंटरटेनमेंट बॅनरखाली बनलेल्या ‘जवान’च्या जगभरातील कलेक्शनबद्दल सांगायचे तर, या एका आठवड्यात त्याने ६६० कोटींचा आकडा पार केला आहे. या दमदार कमाईसोबतच जवानने इतरही अनेक विक्रम केले आहेत.
जवानने हे रेकॉर्ड केले –
- हिंदी चित्रपटातील ओपनिंग डेचे सर्वाधिक कलेक्शन
- पहिल्या आठवड्यात हिंदीत सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट
- २०२३ चा तिसरा सर्वात मोठा चित्रपट
- अॅटलीचा सर्वात मोठा चित्रपट
- ३०० कोटी क्लबमध्ये सर्वात जलद सामील होणारा चित्रपट (५ दिवसांत)
- तीन दिवसांत २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा चित्रपट
- टॉप ओपनिंग वीकेंड फिल्म
जवानाचे बजेट आणि कलाकार
शाहरुख खान व्यतिरिक्त ‘जवान’ मध्ये दीपिका पादुकोण, नयनतारा, सान्या मल्होत्रा, लहर खान, प्रियामणी, एजाज खान आणि विजय सेतुपती सारखे कलाकार आहेत. अॅटलीने सुमारे ३०० कोटी रुपये खर्च करून हा चित्रपट बनवला आहे. पण अवघ्या आठवडाभरातच या चित्रपटाने बजेटपेक्षा दुप्पट कमाई करत ब्लॉकबस्टरचा किताब पटकावला आहे.