नुकतीच याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. ही मुलाखत प्रक्रिया १५ जानेवारी रोजी होणार आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, मुलाखत प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘जगजीवनराम हॉस्पिटल, पश्चिम रेल्वे, मुंबई भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंखा –
पदाचे नाव – डॉक्टर
सीव्हीटीएस मेडिसीन – ०२ जागा
सीव्हीटीएस सर्जरी – ०१ जागा
जनरल सर्जरी – ०१ जागा
जी. आय. सर्जरी – ०१ जागा
ओबीजीवाय – ०१ जागा
पेडियाट्रिक्स – ०१ जागा
गॅस्ट्रोएण्टेरोलॉजी – ०१ जागा
जनरल मेडिसीन – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०९ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवार संबधित विषयातील तज्ञता प्राप्त असावा. सविस्तर माहिती रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. त्याची लिंक खाली जोडली आहे.
वेतन – १ लाख २५ हजार (मासिक)
वयोमर्यादा – कमाल ४५ वर्षे
नोकरी ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता – ७ वा मजला, ऑडिटोरियम, जगजीवनराम रुग्णालय, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई-४००००८
मुलाखतीची तारीख – १५ जानेवारी २०२४
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘पश्चिम रेल्वे’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मुलाखत प्रक्रिया – या भरती करिता थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. मुलाखतीला येण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. तसेच मुलाखतीला येताना जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी. मुलाखत प्रक्रिया १५ जानेवारी रोजी सकाळी ०९ वाजता सुरू होणार आहे. तर दुपारी १२ नंतर आलेल्या उमेदवारांना ग्राह्य धरले जाणार नाहीत.