आयफोनच्या कॅमेऱ्याला टक्कर देण्यासाठी आले Vivo चे दोन दमदार फोन, जाणून घ्या किंमत आणि डिटेल्स

विवो आपल्या एक्स सीरिजमध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोन स्मार्टफोन सादर करत असते. आता कंपनीनं आपल्या ह्या लाइनअपचा विस्तार करत Vivo X100 आणि Vivo X100 Pro हे दोन हँडसेट सादर केले आहेत. दोन्ही स्मार्टफोन्स कॅमेरा सेंट्रिक आहेत. त्याचबरोबर डिव्हाइसमध्ये Dimensity 9300 चिपसेट, ६.७८ इंचाचा मोठा अ‍ॅमोलेड डिस्प्ले, १६जीबी पर्यंत रॅम सारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. चला, जाणून घेऊया ह्याची किंमत किंमत आणि स्पेसिफिकेशनची माहिती.

Vivo X100 आणि Vivo X100 Pro ची किंमत

भारतात Vivo X100 स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. तर Vivo X100 Pro फक्त एक स्टोरेज मध्ये उपलब्ध होईल. विवो एक्स१०० चा १२जीबी रॅम + २५६जीबी मॉडेल ६३,९९९ रुपयांचा आहे. तर १६जीबी रॅम + ५१२जीबी स्टोरेज मॉडेल ६९,९९९ रुपयांमध्ये सादर झाला आहे. विवो एक्स१०० प्रो च्या एकमेव १६जीबी रॅम + ५१२जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ८९,९९९ रुपये आहे.

दोन्ही फोन्सची प्री बुकिंग ४ जानेवारी पासून सुरु होईल. तर फोन ११ जानेवारी २०२४ पासून हे विक्रीसाठी उपलब्ध होतील. लाँच ऑफर अंतर्गत आयसीआयसीआय आणि SBI कार्डवर १० टक्के इंस्टंट डिस्काउंट दिला जाईल. हे दोन्ही मोबाइल फ्लिपकार्ट, विवो स्टोर आणि अन्य रिटेल आउटलेट्सवर विकले जातील.

Vivo X100 आणि Vivo X100 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Vivo X100 आणि Vivo X100 Pro मध्ये ६.७८-इंचाचा LTPO अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. जो १.५के पिक्सल रेजोल्यूशन आणि २०:९ अ‍ॅस्पेक्ट रेशियो, एचडीआर१०+, १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, ३००० निट्स पीक ब्राइटनेस आणि २१६०हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंगला सपोर्ट करतो.

दोन्ही फोनमध्ये ४ नॅनोमीटर प्रोसेस आधारित मीडियाटेक डायमेन्सिटी ९३०० चिपसेट देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर फोनमध्ये ग्राफिक्ससाठी इम्मोर्टलिस-जी ७२० जीपीयू आहे. सोबतीला १६जीबी रॅम व ५१२जीबी पर्यंत यूएफएस ४.० स्टोरेज देण्यात आली आहे. विवो एक्स१०० सीरीज मोबाइल्स अँड्रॉइड १४ वर आधारित आहेत.

Vivo X100 मध्ये ओआयएस आणि एलईडी फ्लॅशसह ५०एमपीचा सोनी आयएमएक्स९२० व्हीसीएस बायोनिक प्रायमरी सेन्सर, ५०एमपीचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि ६४एमपीचा ओआयएस, १००एक्स पर्यंत डिजिटल झूम असलेली टेलीफोटो मॅक्रो लेन्स मिळते.

Vivo X100 Pro मध्ये थोडा वेगळा ओआयएस आणि एलईडी फ्लॅशसह ५०एमपीचा १-इंच सोनी आयएमएक्स९८९ व्हीसीएस बायोनिक सेन्सर, ५०एमपी अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि ५०एमपी १/२″ एपीओ टेलीफोटो कॅमेरा, ओआयएस, १००एक्स पर्यंत डिजिटल झूम आणि मॅक्रो मोड असलेला कॅमेरा आहे. तसेच ह्यात एक खास व्ही३ इमेजिंग चिप देखील आहे. सेल्फीसाठी दोन्ही फोनमध्ये ३२एमपीचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

दोन्ही डिव्हाइसमध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच इन्फ्रारेड सेन्सर, स्टीरियो स्पिकर, आयपी६८ रेटिंग आणि हाय-फाय ऑडियो टेक्नॉलॉजी असे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. Vivo X100 मध्ये १२०वॉट फास्ट चार्जिंगसह ५,०००एमएएचची बॅटरी मिळते. तर Vivo X100 Pro ५,४००एमएएचची बॅटरी आणि १००वॉट फास्ट चार्जिंग, ५०वॉट वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स वायरलेस चार्जिंगसह येतो.

Source link

Vivo X100vivo x100 pro+बेस्ट कॅमेरा फोनबेस्ट कॅमेरा फोन अँड्रॉइडविवो एक्स१००विवो एक्स१०० प्रो
Comments (0)
Add Comment