नुकतीच या भरतीबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून १५ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन याचे सर्व तपशील जाणून घेऊया.
‘टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायर रुग्णालय सहाय्यक प्राध्यापक भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –
सहायक प्राध्यापक (Obstetrics & Gynecology) – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार संबधित विषयात एमडी/ एमएस/ डीएनबी असावा. (MD/MS/DNB -Obstetrics & Gynecology)
वेतन – १ लाख (मासिक)
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे आणि राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे.
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – डिस्पॅच विभाग, तळमजला – टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटल, मुंबई – ४००००८. (अर्ज रुग्णालयाच्या महसूल विभागात प्राप्त होईल.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जानेवारी २०२४
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘बृहन्मुंबई महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच १५ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.