Redmi Note 13 5G ची किंमत
Redmi Note 13 5G स्मार्टफोनचे तीन मॉडेल भारतात आले आहेत. ह्याच्या ६जीबी रॅम व १२८जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १७,९९९ रुपये आहे. तर ८जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज मॉडेल १९,९९९ रुपये आणि १२जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज मॉडेल २१,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल.
फोनची विक्री १० जानेवारी पासून सुरु होईल. फोन ऑफलाइनसह ऑनलाइन अॅमेझॉन इंडियावर विकला जाईल. तसेच कंपनीनं घोषणा केली आहे की फोन ICICI बँक डेबिट व क्रेडिट कार्डनं खरेदी केल्यास १,००० रुपयांचा डिस्काउंट व १,००० रुपये एक्सचेंज बोनसचा फायदा मिळेल.
Redmi Note 13 5G चे स्पेसिफिकेशन्स
रेडमी नोट १३ ५जी फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुलएचडी+ pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन २४०० x १०८० पिक्सल रिजोल्यूशन, १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट, १९२०पीडब्ल्यूएम डिमिंग तसेच १०००निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. रेडमी नोट १३ ५जी फोन अँड्रॉइड १३ आधारित मीयुआय १४ वर चालतो.
डिव्हाइस मीडियाटेक डायमेन्सिटी ६०८० प्रोसेसरसह आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी माली-जी५७ जीपीयू देण्यात आला आहे. ह्यात १२जीबी पर्यंत फिजिकल रॅमसह ८जीबी पर्यंत वर्चुअल रॅम जोडून एकूण २०जीबी रॅमची ताकद मिळवता येईल.
सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Redmi Note 13 5G मध्ये १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळतो. तर मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात १०० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. पावर बॅकअपसाठी ५,०००एमएएचची बॅटरी आहे जी ३३वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.
कनेक्टिव्हिटीसाठी रेडमी नोट १३ स्मार्टफोनमध्ये ६ ५जी बँड्स देण्यात आले आहेत. सोबत Wi-Fi 5GHz, Bluetooth 5.3, Infrared सेन्सर आणि ३.५ मिमी हेडफोन जॅक मिळतो. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे, तसेच ह्यात आयपी५४ रेटिंगही आहे.