महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लीकेशन सेंटर येथे भरती; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील

MRSAC Nagpur Recruitment 2024: ‘एमआरएसएसी’ म्हणजेच महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लीकेशन सेंटर, नागपूर यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे सीनियर प्रोग्रामर, ज्युनियर प्रोग्रामर, असिस्टंट प्रोग्रामर या पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच संस्थेने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

त्यानुसार या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. या मुलाखती १० जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लीकेशन सेंटर नागपूर भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
सीनियर प्रोग्रामर – ०२ जागा
ज्युनियर प्रोग्रामर – ०४ जागा
असिस्टंट प्रोग्रामर – ०७ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १३ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार संबधित विषयात बीई/बीटेक/ एमसीए/ एमसीएम उत्तीर्ण असावा. (BE/ B.Tech. in relevant field OR MCA/MCM course with graduation in BCA / BSc. OR MTech. in Remote Sensing with programming background)

वेतन – (मासिक)
सीनियर प्रोग्रामर – १ लाख
ज्युनियर प्रोग्रामर – ६० हजार
असिस्टंट प्रोग्रामर – २७ हजार

नोकरी ठिकाण – नागपूर

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता – महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटर, नागपूर

मुलाखतीची तारीख – १० जानेवारी २०२४

भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटर’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुलाखत प्रक्रिया – या भरती करिता थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. मुलाखतीला येण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. तसेच मुलाखतीला येताना जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी. मुलाखत प्रक्रिया १० जानेवारी रोजी सकाळी ०९:३० वाजता सुरू होईल.

Source link

Maharashtra Remote Sensing Application CenterMRSAC Nagpur Recruitment 2024MRSAC Recruitment 2024recruitmentमहाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लीकेशन सेंटर भरती
Comments (0)
Add Comment