रायगड: शासन आपल्या दारी हा कार्यक्रम रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात लोणेरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान होणार आहे. याची जय्यत तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यासाठी वाहतुकीमध्ये कोणतेही अडथळे येऊ नये, म्हणून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक ५ शुक्रवारी जानेवारी रोजी बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांनी दिले आहेत.
या कालावधीत बंद ठेवण्यात आलेल्या अवजड वाहतुकीतून जेवण आवश्यक वाहतूक वगळण्यात आली आहे. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून जवळपास ७५ नागरिक लाभार्थी उपस्थित राहतील, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी येणारे नागरिक, पुन्हा परतणारे नागरिकांची कोणतीही महामार्गावर वाहतुकीची गैरसोय होऊ नये म्हणून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

रायगड ५ जानेवारी रोजी रात्री १२ वा. पासून ते ५ जानेवारी रोजी रात्रौ ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत दुध, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना वगळून इतर सर्व जड-अवजड वाहनांना गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या कशेडी आणि खारपाडापर्यंत व मुंबईकडून खारपाडा, ते पोलादपूरकडे जाणाऱ्या वाहनांना त्याचप्रमाणे खोपोली-पालीफाटा ते वाकण महामार्ग क्रमांक ५८४ (अ) या महामार्गावरुन गोवाकडे जाणान्या व मुंबई बाजुकडे येणाऱ्या अशा सर्व जड-अवजड वाहनांसाठी वाहतुक बंद केली आहे. तसेच ५ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत व दुपारी १५ ते २२ वा. या कालावधीत गोवा मार्गे येऊन मुंबईकडे जाणारी वाहने ही मोबें मार्गे माणगाव अशी वळविण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहेत.