दीपोत्सव 2023 : बलिप्रतिपदा आणि साडेतीन मुहुर्तांपैकी एक दिवाळी पाडवा; वाचा, महत्त्व, कथा व मान्यता

अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.

आपल्याकडील कृषिप्रधान संस्कृतीमुळे पौराणिक महत्त्व दिले गेलेले आपले सर्व सण-वार या निसर्गावरच प्रामुख्याने आधारलेले आहेत. पौराणिक महत्त्व असलेला आणि कृषिप्रधान संस्कृतीचं प्रतिबिंब दाखवणारा कार्तिक महिन्याचा हा आरंभदिन अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. पूर्वापार हा दिवस नव्या सुरुवातीचाच मानला जातो. यंदा मंगळवार, १४ नोव्हेंबर २०२३ रोजी दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा साजरा होत आहेत. तर १५ नोव्हेंबर रोजी भाऊबीजेने यंदा दीपोत्सवाची सांगता होणार आहे. दिवाळी पाडव्याचे महत्त्व, मान्यता, परंपरा आणि पौराणीक कथा जाणून घेऊया…

Source link

balipratipada story in marathidiwali padwa 2023importance of diwali padwa in marathisignificance of diwali padwaदिवाळी पाडवाबलिप्रतिपदा
Comments (0)
Add Comment