मी काही लेचापेचा नाही, आता आशीर्वाद द्यायचं काम करा​​, दादांच्या निशाण्यावर पुन्हा शरद पवार!

नाशिक : वयोवृद्ध ८०-८५ वर्षांच्या व्यक्तींनी आता आशीर्वाद देण्याचे आणि सल्ला देण्याचे काम करावे, असा उपरोधिक सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता शरद पवार यांना दिला. नाशिक शहरातील महाकवी कालिदास कला मंदिर या सभागृहात एका पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना अजित पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी भाषण करताना अजित पवार यांनी काका शरद पवार यांना उपरोधिक टोला लगावला.

गुरुवारी नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्या माध्यमातून पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कला, क्रीडा, कृषी, सहकार, अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ होते. तर या कार्यक्रमासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, राष्ट्रवादी आमदार दिलीप बनकर हे देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांचं नाव न घेता त्यांच्या वयाचा उल्लेख करून त्यांना आरामाचा सल्ला दिला.

एकनाथ शिंदेंनी ‘ती’ गोष्ट स्वत:हून मला सांगितली होती, आव्हाडांचा अजितदादांबाबत गौप्यस्फोट

मी काही लेचापेचा नाही, आता आशीर्वाद द्यायचं काम करा

मी काही लेचापेचा नाही, जी वस्तुस्थिती आहे, ती स्पष्टपणे मांडतो. तुमच्यासमोर एक बोलायचं आणि पाठीमागे एक बोलायचं असा माझा स्वभाव नाहीये. गेल्या ३०-३५ वर्षाच्या आयुष्यातील गोष्टी ऐकल्यास, तुम्ही देखील म्हणाल, की आता या लोकांना संधी दिली पाहिजे आणि ८०-८५ वर्षाच्या व्यक्तींनी आशीर्वाद देण्याचे, सल्ले देण्याचे काम केले पाहिजे, असे म्हणत अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या उल्लेख करून त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

छगन भुजबळांविरुद्ध पहिला शड्डू, येवल्यातून विधानसभा उमेदवार ठरला, कोणत्या पक्षाकडून रिंगणात?

प्रभू श्रीरामचंद्र पूर्ण फॅमिलीला घेऊन नाशिकमध्ये राहिले – मंत्री छगन भुजबळ

नाशिकचं वातावरण इतकं चांगलं आहे की प्रभू श्रीरामचंद्र सुद्धा पूर्ण फॅमिलीला घेऊन इथेच राहिले, असे वक्तव्य राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये केले. नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिर या ठिकाणी एका पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाषणात बोलताना छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केले.

Source link

ajit pawarajit pawar attack on sharad pawarSharad Pawarअजित पवारअजित पवार यांची शरद पवार यांच्यावर टीकाशरद पवार
Comments (0)
Add Comment