उपचारासाठी अमरावतीहून नागपूरमध्ये आले, परताना काळाचा घाला, माय-लेकाचा दुर्दैवी अंत तर…

नागपूर : वाडी पोलीस स्टेशन, नागपूर अंतर्गत अमरावती रोडच्या आठव्या मैल चौकात भरधाव वेगात कार नियंत्रणाबाहेर जाऊन दुभाजकाला धडकून रस्त्यावर पलटी झाली. या कारला पलीकडून येणाऱ्या आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर कारमध्ये प्रवास करणारी दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ही खळबळजनक घटना अमरावती मार्गावरील आठवा मैल परिसरात गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली आहे.
भारतीय तरुण दुबईत मालामाल, एका रात्रीत जिंकले ४५ कोटी, पण वाट्याला येणार फक्त दीड करोड, कारण…
मिळालेल्या माहितीनुसार, वाडी पोलीस ठाण्यांतर्गत अमरावती रोडवरील आठव्या मैल चौकात गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये अक्षय सुभाषराव गिरनाडे आणि त्याची आई रजनी सुभाषराव गिरनाडे यांचा समावेश आहे. तर या अपघातात त्यांची मुलगी श्रद्धा गिरनाडे ही गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

अक्षय हा आई रजनी आणि बहिणीसह नागपुरात वैद्यकीय तपासणीसाठी आला. तपासणी संपल्यानंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास तो कारने अमरावतीकडे निघाला. वाडीतील आठवा मैल परिसरात समोर काही तरी आडवे आल्याने अक्षयचे कारवरील नियंत्रण सुटले. यावेळी आठव्या मेल चौकात भरधाव वेगात असलेल्या कारचे नियंत्रण सुटून दुभाजकाला धडकून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उलटली. यादरम्यान पलीकडून येणाऱ्या आयशर ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कार रस्त्याच्या कडेला खेचून संरक्षण गेटवर आदळली.

शिवरायांच्या इतिहासापासून रावणाच्या लंकेपर्यंत, राजकारणाशी सांगड घालत अमोल कोल्हेंचं तडाखेबाज भाषण

या अपघातात अक्षय आणि त्याची आई रजनी यांचा जागीच मृत्यू झाला तर बहीण श्रद्धा या अपघातात गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर संपूर्ण परिसरामध्ये लोकांची गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच वाडी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले तर गंभीर जखमी श्रद्धा हिलाही उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे कुटुंब अमरावतीहून नागपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी आले होते. दुपारी कारने घरी परतत असताना हा अपघात झाला. याप्रकरणी वाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Source link

mile chowk accidentnagpur accident newsNagpur newsअपघातात आई मुलाचा मृत्यूनागपूर अपघात बातमीनागपूर बातमीमैल चौकात अपघात
Comments (0)
Add Comment