चंद्रग्रहणात काय करावे आणि काय करू नये, जाणून घेऊया सर्व खास गोष्टी

शनिवार २८ ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमेच्या रात्री वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. यावेळी हे ग्रहण भारतात दिसणार आहे, त्यामुळे त्याचे नियम पाळणे गरजेचे आहे. हे ग्रहण रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी वाजता सुरू होईल आणि २ वाजून २४ मिनिटांनी संपेल. ग्रहणाचा सुतक कालावधी ९ तास आधी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी सुरू होईल आणि ग्रहण संपल्यावर समाप्त होईल. आज आम्ही तुम्हाला ग्रहण काळात काय करावे आणि काय करू नये ते सांगत आहोत.

चंद्रग्रहणात स्वत:वर संयम ठेऊन माळ जप केल्याने अनेक पटींनी लाभ होईल. ‘ऊं नमो नारायणाय’ या मंत्राचा ८ हजार वेळा जप केल्याने तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मीक लाभ मिळेल. असे केल्याने तुमची स्मरणशक्ती वाढेल.

ग्रहणकाळात जेवण करू नये आणि शक्य झाल्यास पाणीपण पिऊ नये. पण वृद्ध व्यक्ती, लहान मुले, गर्भवती महिलांसाठी या नियमात थोडी सुट असते. हे सर्व आपआपल्या क्षमतेनुसार अन्न पाणी घेऊ शकतात.

ग्रहणकाळात घरात शिजवलेले आणि तयार ठेवलेले अन्न खाऊ नये. शिजवलेले अन्न गाई व कुत्र्याला खाऊ घालावे आणि नवीन जेवण तयार करावे. दुधापासून बनवलेल्या वस्तूंमध्ये तुळस टाकून ठेवा. अन्यथा, ग्रहणानंतर ते खाण्यायोग्य राहत नाही.

ग्रहण पूर्ण झाल्यावर चंद्राचे दर्शन घेऊन जेवण करावे. ग्रहणावेळी घातलेले कपडे स्नान केल्यानंतर घालू नये स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालावे.

चंद्रग्रहणानंतर पांढऱ्या वस्तू साखर आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ दान करावे. असे केल्याने अशुभ प्रभावाला सामोरे जावे लागत नाही आणि कुंडलीत असलेला चंद्रदोष देखील कमी होतो.

ग्रहणकाळात पती-पत्नीने संयम बाळगून ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे. ग्रहणकाळात निर्माण झालेल्या नात्यांमधून जन्मलेल्या मुलांमध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा.

ग्रहणाच्या वेळी कोणतेही शुभ किंवा नवीन कार्य सुरू करू नये. ग्रहण काळात व्यक्तीने झोपण्याऐवजी धार्मिक पुस्तकांचे वाचन किंवा देवाचे नामस्मरण करावे.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

chandra grahan 2023chandra grahan in marathichandra grahan niyammoon eclipse do or dont rulesचंद्रग्रहण २०२३चंद्रग्रहणाचे नियम
Comments (0)
Add Comment