अमली पदार्थ पुरवठादारांची गय करणार नाही, रेव्ह पार्टी प्रकरणानंतर पोलीस आयुक्तांचा इशारा

ठाणे : अमली पदार्थांमुळे तरुण पिढी वाममार्गाला लागत आहे, त्यांचे करिअर संपुष्टात येत असल्याने येत्या काळात अमली पदार्थ प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. अमली पदार्थ विक्रेत्यांवरही आणखी कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट प्रतिपादन ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी केले. त्यांनी ठाणे शहराच्या पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत ठाणे पोलिसांची अमली पदार्थविरोधी मोहीम तीव्र झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’शी डुंबरे यांनी विशेष बातचीत केली. ठाण्यातील रेव्ह पार्टीवर वागळे युनिट पाचने केलेली कारवाई ही अमली पदार्थ विक्रेत्यांना थेट इशारा असून येत्या काळात ड्रग पेडलर्सची साखळी मोडून काढू, अशी ग्वाही डुंबरे यांनी दिली.

ठाण्यात खाडीकिनारी रंगलेल्या रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या वागळे युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके आणि त्यांच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री छापा टाकला. या पार्टीतून ९० तरुण आणि पाच तरुणींसह दोन आयोजकांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी अंमली पदार्थांसह मद्यसाठा जप्त केला. नववर्ष स्वागत निमित्ताने आयोजित पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांची विक्री व सेवन होते. त्यावर नजर ठेवून कडक कारवाई करण्याचे निर्देश डुंबरे यांनी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या सर्व युनिटना निर्देश दिले होते. शहरात तरुणाई अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकत असेल, तर ही गंभीर बाब आहे. गुन्हे शाखेचे अमली पदार्थविरोधी पथक व इतर युनिटच्या मदतीने या ड्रग पेडलर्सना रोखण्याची रणनीती आखण्यात येत आहे. लवकरच या मोहिमेला मूर्त स्वरूप दिले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा, अब्दुल सत्तार संतापले; आक्षेपार्ह भाषेत पोलिसांना लाठीमाराचे आदेश

दहा दिवसांमधील कारवाईचा आलेख

ठाणे पोलिस आयुक्त पदाचा कार्यभार २१ डिसेंबर २०२३ रोजी आशुतोष डुंबरे यांनी स्वीकारला. त्या दिवसापासूनच शहरात अमली पदार्थविरोधी कारवायांना वेग आला.

– २५ डिसेंबर रोजी महागिरी कोळीवाडा येथे युनिट पाचने कारवाई करून दानिश शेख, राहुल पवार या दोन ड्रग तस्करांना अटक केली. त्यातील दानिशकडे तीन लाख ७५ हजारांचे २५० ग्रॅम तर राहुलकडून १५ हजारांचा १० ग्रॅम चरस जप्त करण्यात आला.

– २८ डिसेंबर रोजी मुंब्रा येथे युनिट एकने कारवाई करून दिलावर खान याला अटक केली. त्याच्याकडून ३०. ५ ग्रॅम एमडी जप्त केले.

– २८ डिसेंबर रोजी सिव्हिल हॉस्पिटलसमोर अंमली पदार्थ विरोधी पथकाने जयेश कांबळी ऊर्फ गोलु, विघ्नेश शिर्के ऊर्फ विघ्न्या या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ७८.८ ग्रॅम एमडी केले.

हे सरकारच रेव्ह पार्टीतून निर्माण झालं आहे; संजय राऊतांची शिंदे-फडणवीस-पवार सरकारला डिवचलं

Source link

ashutosh dumbredrugs dealersnarcotics suppliersrave partiesThane newsthane policethane police comissionerthane rave party
Comments (0)
Add Comment