तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख
आंबेगाव बुद्रुक परिसरातील सर्व्हे नं. ३६ आणि ४६ तसेच आगम मंदिर सर्व्हे नं.६६ मधील अनधिकृत बांधकामावर शहर बांधकाम विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली असून यात ११५०० चौरस फूट अवैध बांधकाम जमिनोदोस्थ करण्यात आले आहे.
मनपा परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे बांधून ते विकू नये विकत घेणाऱ्याने स्वस्तात मिळते म्हणून घेवून स्वतःचे नुकसान करून घेवू नये.अनधिकृत बांधकामांना पाठीशी न घालता धडक आणि नियमित कारवाई होणार असल्याचे शाखा अभियंता अभिजित भुजबळ यांनी स्पष्ट केल्यावर तसेच पुण्याच्या आयुक्तांनी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी सूचना केली असून तोच धागा पकडत
असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंटस पुणे या संस्थेने आपल्या सभासदांसाठी एक परिपत्रक जाहीर केले असून त्यात पुण्याचा बकालपना वाढू नये व आपल्या ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून नवीन गुंठेवारी किंवा अनधिकृत बांधकाम असलेल्या प्रॉपर्टीचे व्यवहार कोणी करू नका महानगरपालिकेकडून कडक कारवाई होत आहे एखाद्याच्या आयुष्यभराची पुंजी आपल्या थोडे कमिशन साठी अजिबात पणाला लावू नका कायदेशीर आहे तेच काम करा आपण पण सुखी रहा आणि आपल्या ग्राहकांना ही सुखी ठेवा असा संदेश दिला असून
असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट नेहमीच आपल्या ग्राहकांच्या पाठीशी उभी राहिली असून ग्राहकांना येणारा समस्यांवर शासन दरबारी आवाज उठवून असंघटित आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर राहिली आहे रेडीरेकनरचे दर असो अथवा पोलीस वेरिफिकेशन सारखा संवेदनशील विषय असो सब रजिस्टर कार्यालयातील असूविधान संदर्भातील विषय असो प्रत्येक वेळी नागरिकांच्या वतीने असोसिएशनने आपले कर्तव्य पार पडले आहे ग्राहक हाच केंद्रबिंदू मानून असोसिएशनने लढा उभा केला आहे
बेकायदेशीर बांधकामन बद्दलही असोसिएशनने ठोस भूमिका घेत आपल्या सभासदांना असे कोणतेही अनधिकृत विक्री चे व्यवहार POA अथवा भाडेकरारावर करून लोकांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेणे संदर्भात सूचना दिली आहेत
सचिन शिंगवी
अध्यक्ष असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंटस पुणे