मी कामाचा माणूस, आलतू फालतू बोलणार नाही; आव्हाडांचं नाव येताच अजितदादांचं ‘नो कमेंट्स’

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात रंगलेल्या अंतर्गत लढाईची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, ‘श्रीराम हा मांसाहारी होता’ अशा आशयाचे वक्तव्य केले होते. यावरुन रोहित पवार यांनी आव्हाड यांना घरचा आहेर दिला होता. त्यावर आव्हाड यांनीही रोहित पवार हे राजकारणात अजून नवखे असल्याचा टोला लगावला होता. या दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक द्वंद्वाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. याविषयी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी या वादापासून दूर राहणेच पसंत केले. ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदेंनी ‘ती’ गोष्ट स्वत:हून मला सांगितली होती, आव्हाडांचा अजितदादांबाबत गौप्यस्फोट

यावेळी अजित पवार यांना, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्यातील वादावर तुमची काय प्रतिक्रिया काय आहे?, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, नो कमेंटस! मला त्यामध्ये काहीही बोलायचं नाही. तुम्ही कशाकरिता खपल्या उकरुन काढायचं काम करता?, अशा शब्दांत अजितदादांना पत्रकारांना फटकारले. जितेंद्र आव्हाड यांनी अलीकडेच अजित पवार हे राष्ट्रवादीत असताना दादागिरी करायचे, असा आरोप केला होता. याबद्दल विचारणा केली असता अजितदादांनी म्हटले की, ‘त्याच्याबद्दल आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी आज सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात केली आहे. मी कामाचा माणूस आहे. मी असली आलतू फालतू उत्तर द्यायला बांधील नाही. तुम्ही मला कामाचे प्रश्न विचारा, असे अजित पवारांनी म्हटले. तर सुनील तटकरे यांनी आव्हाड आणि रोहित पवार यांच्यातील वाद म्हणजे शरद पवार गटातील अंतर्गत वादाची सुरुवात असल्याचे म्हटले आहे.

….तर महाविकास आघाडीचे सरकार टिकले नसते, सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा

शरद पवार-अजित पवार आज एकाच मंचावर येणार?

पुण्यात आज १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ होणार आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संध्याकाळी पाच वाजता या सोहळ्याची सुरुवात होईल. यानिमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे एकाच मंचावर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काका-पुतण्याची जोडी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्याचे टाळत आहे. त्यामुळे आज हा दुर्मिळ राजकीय योग जुळून येण्याची शक्यता आहे.

राम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता; वादग्रस्त विधानानंतर जितेंद्र आव्हाडांनी खेद व्यक्त केला

Source link

ajit pawarJitendra Awhadncp crisisPune newsRohit Pawarअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसरोहित पवार
Comments (0)
Add Comment