हायलाइट्स:
- सदाभाऊ खोत यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर हल्लाबोल.
- ठाकरे आणि पवार हे पाठीत खंजीर खुपसणारे हे खरे आहे- सदाभाऊ खोत.
- शरद पवार हे चकवा देणारे राजकारणी आहेत- सदाभाऊ खोत.
नांदेड : महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वी पाठीत खंजीर खुपसणारा एकच चेहरा होता, आता मात्र दोन चेहरे झालेत, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटल (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला होता. याचे पदसाद आता राज्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत. चंद्रकात पाटील यांच्या या वक्तव्यावर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेले भाष्य वास्तववादी आहे असे खोत यांनी म्हटले आहे. (former minister of state sadabhau khot criticizes ncp chief sharad pawar after criticism by chandrakant patil)
शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल कुठेही विकता आला पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे. परंतु ज्यावेळी कृषी विषयक विधेयक सभागृहात आले त्यावेळी मात्र त्याला पवार यांनी मूक संमती दिली. त्यांनी सत्ता मिळावी यासाठी काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केली. अनेकांना सत्तेसाठी चकवा देखील दिला, असे सांगतानाच शरद पवार यांची कुटनीती उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. म्हणून देशपातळीवरील राजकारणात शरद पवारांना अथवा त्यांच्या एखाद्या घोषणेला फारसे महत्व दिले जात नाही, असा घणाघाती हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी पवार यांच्यावर केला आहे.
क्लिक करा आणि वाचा- ईडी, सीबीआयच्या कारवायांवरून सुप्रिया सुळेंचा भाजप, केंद्र सरकारवर वार
‘शरद पवार हे चकवा देणारे राजकारणी’
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडताना सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की, शरद पवार हे चकवा देणारे राजकारणी आहेत. शरद पवार यांचा हा गुण देशपातळीवरील राजकारण्यांना माहीत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची चाल पूर्ण महाराष्ट्राला माहीत झालेली आहे. म्हणूनच चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानाशी मी सहमत आहे.
क्लिक करा आणि वाचा- सप्टेंबरमध्ये करोनाचे निर्बंध कडक होणार?; पालकमंत्री अस्लम शेख यांचे मोठे विधान
चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणाले होते?
भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, पाठीत खंजीर खुपसला असे म्हटले की पूर्वी एकच चेहरा समोर यायचा आणि दुसरा चेहराही समोर येतो आणि तो दुसरा चेहरा कोण? तो म्हणजे उद्धव ठाकरे.
आता कोणाशी युती नको. आता भाजप एकट्याच्या बळावर निवडणूक लढवून सरकार स्थापन करणार. फक्त जे प्रामाणिकपणे आपल्या सोबत आहेत ते आपल्या सोबत आहेतच. सोबत निवडणूक लढवणार. पण नाव मोठं लक्षण खोटं आपल्याला नको. पाठीत खंजीर खुपसणारे आपल्याला नकोत. मोदींच्या जीवावर निवडून यायचे आणि मोदींवरच टीका करायची, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली होती.
क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! कोवीन अॅप हॅक करून १६ जणांनी घेतली लस