१० लाखांपेक्षा जास्त लोकांनी बुक केला Oppo Find X7
चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पो ८ जानेवारी २०२४ ला चीनी बाजारात Oppo Find X7 आणि Oppo Find X7 Ultra असे दोन प्रिमीयम स्मार्टफोन सादर करणार आहे. स्मार्टफोनच्या प्री-रिजर्वेशन आधीच लाइव्ह झालं आहे. आता कंपनीनं घोषणा केली आहे की ह्या सीरीजसाठी ऑनलाइन रिजर्वेशन सर्व चॅनेलवर १ मिलियन पेक्षा जास्त झाले आहेत. त्यामुळे ह्या आगामी हायएंड स्मार्टफोन्सची किती लोकप्रियता आहे हे स्पष्ट झालं आहे.
Oppo Find X7 सीरीजचे स्पेसिफिकेशन्स
Oppo Find X7 मध्ये डायमेन्सिटी ९३०० चिपसेट आहे. फोनमध्ये १६जीबी पर्यंत रॅम आणि १टीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. दुसरीकडे Find X7 Ultra मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 आणि समान स्टोरेज कॉन्फिगरेशन मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये एक सारखी डिजाइन देण्यात येईल. फ्रंटला कर्व्ड एजसह एक पंच होल कटआउट आहे, तर मागे एक मोठ्या कॅमेरा मॉड्यूलसह ड्यूल टोन पॅनल आहे.
Find X7 मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, तर Find X7 Ultra मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. हा पहिला स्मार्टफोन आहे ज्यात १-इंच सोनी एलवायटी-९०० ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. हा ड्युअल पेरिस्कोप टेलीफोटो शूटर असलेला पण पहिला स्मार्टफोन आहे. बाजारात आल्यानंतर ह्या स्मार्टफोन सीरिज विवो एक्स१०० सीरिज, वनप्लस १२ आणि शाओमी १४ सीरिज कडून टक्कर मिळेल.