यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून १० फेब्रुवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षेद्वारे नियुक्ती केलो जाणार आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
वरिष्ठ सहाय्यक – २१ जागा
कनिष्ठ सहाय्यक – ५४ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ७५ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवार संबधित विषयात अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा पदवीधर असावा. विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
वेतन –
वरिष्ठ सहाय्यक – ३६ हजार ते १ लाख १० हजार
कनिष्ठ सहाय्यक – ३१ हजार ते ९२ हजार
वयोमर्यादा – किमान १८ ते कमाल ३० वर्षे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गाला ३ वर्षांची तर एससी/ एसटी प्रवर्गाला ५ वर्षांची सवलत देण्यात आली आहे.
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख – १० जानेवारी २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० फेब्रुवारी २०२४
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘भारतीय विमानतळ प्राधिकरण’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच १० फेब्रुवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.