या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. ही मुलाखत प्रक्रिया १० जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता आणि मुलाखत प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
पदवीधर अप्रेंटिस – ६३ जागा
तंत्रज्ञ (डिप्लोमा) अप्रेंटिस – १० जागा
बी. कॉम अप्रेंटिस – ०८ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ८१ जागा
शैक्षणिक पात्रता –
पदवीधर अप्रेंटिस – संबधित विषयातील अभियांत्रिकी पदवीधर
तंत्रज्ञ (डिप्लोमा) अप्रेंटिस – संबधित विषयातील अभियांत्रिकी डिप्लोमा
बी. कॉम अप्रेंटिस – कॉमर्स विषयात पदवीधर
वेतन/ स्टायपेंड –
पदवीधर अप्रेंटिस – १७ हजार ५००
तंत्रज्ञ (डिप्लोमा) अप्रेंटिस – १२ हजार ५००
बी. कॉम अप्रेंटिस – १० हजार ५००
वयोमर्यादा – कमाल २५ वर्षे
(कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गाला ३ वर्षांची तर एससी/एसटी प्रवर्गाला ५ वर्षांची सवलत देण्यात आली आहे.)
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, नंदमबक्कम, चेन्नई ६०००८९.
मुलाखतीची तारीख – १० जानेवारी २०२४
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मुलाखत प्रक्रिया – या भरती करिता थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. मुलाखतीला येण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. तसेच मुलाखतीला येताना जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे सोबत आणावी. मुलाखत प्रक्रिया १० जानेवारी रोजी सकाळी १०:०० वाजता सुरू होईल.