ASUS ROG Phone 8 Pro ची डिजाइन
ASUS ROG Phone 8 Pro मध्ये उजवीकडे पावर आणि वॉल्यूम रॉकर बटनसह एक बॉक्सी डिजाइन मिळेल. फ्रेमच्या डावीकडे एक यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. ROG Phone 8 Pro च्या फ्रंटला एक सेंट्रल पंच-होल कटआउट आहे. स्क्रीनच्या चारही बाजूंना स्लिम बेजेल्स देण्यात आले आहेत.
ASUS ROG Phone 8 Pro मध्ये चौकोनी कॅमेरा मॉड्यूल मिळेल. ह्यात तीन कॅमेरा सेन्सर आहेत आणि ८के अल्ट्रा एचडी व्हिडीओ रेकॉर्डिंग असलेला एक टेक्स्ट आहे. लीक झालेल्या रेंडरनुसार, Phone 8 Pro मध्ये एक वेगळी लाइट असलेला ROG लोगो असण्याची शक्यता आहे. फोनवर ROG लोगो डॉट्स जोडून बनला आहे जो स्पेशल एलईडी डॉट्ससह प्रोग्राम केला जाऊ शकतो.
ROG Phone 8 Pro मध्ये खालच्या बाजूला एक यूएसबी-सी पोर्ट, एक ३.५मिमी हेडफोन जॅक, एक स्पिकर ग्रिल आणि एक सिम ट्रे देण्यात आला आहे. ASUS ROG Phone 8 Pro मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर दिला जाईल. फोनमध्ये सेफ्टीसाठी आयपी६८ रेटिंग आहे जी धूळ आणि पाण्यातही फोन सुरक्षित राहू शकतो, हे दर्शवते. आगामी स्मार्टफोनमध्ये १०एक्स झूमसह टेलीफोटो कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. व्हिडीओ शूट करण्यासाठी ह्यात अँटी-शेक गिम्बल देखील आहे.
८ जानेवारीला जागतिक बाजारात लाँच केल्यानंतर काही महिन्यांनी ही सीरिज भारतीयांच्या भेटीला येऊ शकते. कारण सध्या कंपनीची ही एकमेव स्मार्टफोन सीरिज आहे जी भारतीय बाजारात उपलब्ध आहे आणि भारतातील मोबाइल गेमिंगचे मार्केट कंपनी इतक्या सहज हातातून जाऊ देईल असे वाटत नाही.