महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केलेल्या विधानला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुजोरा दिला आहे. सुप्रिया सुळे या अजित दादांमुळे खासदार झाल्या आहेत, दादा नसल्यामुळे नवरा मुलांना सोडून बारामतीमध्ये तळ ठोकावा लागत आहे, अशी बोचरी टीका महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंवर केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात संतापाची लाट पसरली होतो. मात्र कधी एकमेकांवर टीका कारण नाही, असे जाहीर स्पष्टीकरण दिल्यानंतर ही आज अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला.
रूपाली चाकणकर यांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चाकणकरांना सुनावले होते. कोणतीही राजकीय पार्श्वभूमीवर नसलेले शरद पवार यांनी आपला मतदारसंघावर ६० वर्ष असेच राज्य केले का? मतदारसंघ सोडून त्यांनी देशात नाव केले. त्याचे बारामती लोकसभा मतदारसंघात काहीच योगदान नाही का ? असा प्रश्न चाकणकरांना करत अजित पवार सुद्धा शरद पवार मुळे नेते झाले आहेत, असे विधान आव्हाड यांनी केले होते. मात्र आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया देत सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. विविध प्रकल्प आणि कामाच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान त्यांना प्रश्न विचारण्यात आला की अजित पवारांमुळेच सुप्रिया सुळे या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत? या बाबत अजित पवार म्हणाले “निवडून येणाऱ्याला ही माहीत आहे कोण कोणा मुळे निवडून आले आहे आणि निवडून आणणाऱ्यालाही माहिती कोण कोणामुळे निवडून आले” असे म्हणत अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.