‘राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम’ येथे नोकरीची उत्तम संधी; आजच करा अर्ज

National Hydroelectric Power Corporation Recruitment 2024: राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेड यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. याद्वारे ट्रेनी इंजिनियर आणि ट्रेनी ऑफिसर फायनान्स या पदांची नियुक्ती केली केली जाणार आहे. एकूण ८९ रिक्त जागांसाठी ही भरती होणार आहे. नुकतीच याबाबत कंपनीने अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

यासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून २२ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेड भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
ट्रेनी इंजिनियर सिव्हिल – १८ जागा
ट्रेनी इंजिनियर इलेक्ट्रिकल – १६ जागा
ट्रेनी इंजिनियर मेकॅनिकल – ४७ जागा
ट्रेनी ऑफिसर फायनान्स – ०८ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ८९ जागा

शैक्षणिक पात्रता –
ट्रेनी इंजिनियर – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्णवेळ अभ्यासक्रम असलेली संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.
ट्रेनी ऑफिसर फायनान्स – उमेदवार सीए परीक्षा उत्तीर्ण असावा.
( या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे. )

वेतनश्रेणी – (मासिक)
५० हजार ते १ लाख ६० हजार

अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख
– २२ जानेवारी २०२४

भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २२ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.

Source link

National Hydroelectric Power Corporation JobsNHPC Bharti 2024NHPC Recruitment 2024recruitmentराष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा निगम भरती २०२४
Comments (0)
Add Comment