रायगड: सध्या शैक्षणिक सहलीचे दिवस सुरु आहेत. आई वडील आपल्या मुलांना शिक्षक व शाळेच्या जबाबदारीवर सहलीच्या माध्यमातून फिरण्यासाठी पाठवत असतात. मात्र काही शाळा या बेजबाबदार तर शिक्षक अगदीच बेदरकार वागत असल्याचे समोर येत आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका अंतर्गत येणाऱ्या भासे येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील विद्यार्थी सहलीनिमित्त कोकण फिरण्यासाठी आले होते.
मात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी मोठ्या विश्वासाने आपल्या मुलांची जबाबदारी सोपवलेले या शाळेतील शिक्षक आणि त्यासोबतच बस चालकही मद्यधुंद अवस्थेत होते. अखेर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून बसचा भीषण अपघात झाला. एसटी महामंडळाच्या बसने कोकणातील दिवेआगार आणि हरिहरेश्वर फिरण्यासाठी शालेय विद्यार्थी आले होते. रात्र झाल्यामुळे सहलीची गाडी म्हसळा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे वस्तीला होती.

गाडीतील सर्व विद्यार्थ्यांना निवासस्थळी उतरवून चालक आणि शिक्षक जेवण करून येतो, असे सांगून बस घेऊन गेले. मात्र जेवणाचे कारण सांगून गेलेले चालक व शिक्षक तिकडे जाऊन दारू पिण्यात धुंद होते. अत्यंत मद्यधुंद अवस्थेत म्हसळातील शाळेत परतत असताना बस खड्यात घसरली आणि अपघात झाला. या बसचा चालक एवढा मद्यधुंद होता की त्याने आपल्या पॅन्टमधेच लघुशंका केली होती. या अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ तेथे मोठ्या प्रमाणात जमा झाले. चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.