पुणे: जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध संपूर्ण राज्यातून व्यक्त केला जात आहे. त्यात सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नो कमेंट्स अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य हे मूर्खपणाचे आहे. “बदनाम हूए तो क्या हूआ नाम तो हुआ” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड येथे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त अटल विना मूल्य माहा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिराला भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले की, पुण्यात झालेली हत्या ही त्याच्या साथीदाराने केलेली आहे. कुठलाही गँगवॉर होणार नाही. कुख्यात गुंड कुठलाही असो त्याचा बंदोबस्त या शासनात केला जातो. त्यामुळे कुठलाही प्रकारचा गँगवॉर करण्याची कुणीही हिम्मत करणार नाही.

भाजप आमदार दिलीप कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली त्यावर फडणवीस म्हणाले की, मी रायगडला कार्यक्रमाला होतो. त्यावेळी मला उडत उडत माहिती समजली. मात्र माझं त्यांच्याशी अद्याप बोलणे झालेले नसल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. लक्ष्मण भाऊंचे सगळे स्वप्न भाजप पूर्ण करेल. आता आमची महायुती आहे आणि महायुतीचा शब्द पूर्ण करण्याचे काम आम्ही करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य हे मूर्खपणाचे असून प्रभू श्रीराम हे सर्वांचेच आहेत. विनाकारण लोकांच्या भावनांना ठेच पोहचवण्याचे काम आहे. जे लोक स्वतः ला हिंदुत्ववादी म्हणवतात ते मात्र यावर मौन धारण करून बसले असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.