शस्त्रक्रियेवेळी रुग्णाचा मृत्यू; मजदूर संघाचा रेल्वे रुग्णालयात गोंधळ; नियंत्रण कक्ष बंद पाडला

नागपूर: रुग्णाच्या मृत्युनंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातल्याने तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाला होता. दरम्यान संतप्त कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्षही बंद पाडल्याने त्याचा परिणाम रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर झाला होता. सुनील नीतनवरे (५४) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.
रुग्णालयातून सोडल्यानंतर घरी जाण्याची उत्सुकता; मात्र बाप-लेकासोबत वाटेतच विपरीत घडलं अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील नीतनवरे हे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात गार्ड आहेत. मनगटावरील छोट्या शस्त्रक्रियेसाठी ते आज रेल्वे रुग्णालयात दाखल झाले होते. दुपारी ३ च्या सुमारास शस्त्रक्रिया सुरू असतानाच त्यांचा मत्यू झाला. हे कळताच सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन यांचे प्रतिनिधी रुग्णालयात आले. त्यांनी तेथे निदर्शने सुरू केली. शस्त्रक्रियेच्यावेळी अतिरिक्त ॲनेस्थेशिया दिल्याने नीतनवरे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती. तर त्यांचा मृत्यू हृदयक्रिया बंद पडल्याने झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते.

राजकारणात एन्ट्रीची महत्त्वाकांक्षा, पण त्याआधीच खेळ खल्लास; मोहोळला संपवणारा सूत्रधार सापडला

संतप्त कर्मचाऱ्यांनी नियंत्रण कक्ष बंद पाडला. रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीत सर्वात मोठी आणि महत्त्वाची भूमिका नियंत्रण कक्षाची असते. मात्र तोच बंद झाल्याने त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला. काही गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या, तर काही गाड्यांना मॅन्युअली संकेत देऊन काढण्यात आल्या. नियंत्रण कक्ष बंद झाल्याचे कळताच डीआरएम तुषारकांत पांडेय यांच्यासह रेल्वेचे अन्य वरिष्ठ अधिकारी तेथे पोहचले. त्यांना कर्मचाऱ्यांनी घेराव घातला. रुग्णालयातील परिस्थितीवर नियंत्रणासाठी आरपीएफ तसेच शहर पोलिसही घटनास्थळी आले. रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

Source link

Nagpur newsrailway employees riotedrailway employees rioted in hospitalकर्मचाऱ्यांचा रेल्वे हॉस्पिटलमध्ये गोंधळनागपूर बातमी
Comments (0)
Add Comment