supriya sule criticizes bjp: ईडी, सीबीआयच्या कारवायांवरून सुप्रिया सुळेंचा भाजप, केंद्र सरकारवर वार

हायलाइट्स:

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांचे केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र.
  • ईडी आणि सीबीआयच्या कारवाया सूडबुद्धीने केल्या जात आहेत- सुप्रिया सुळे.
  • महाराष्ट्रात व्यक्तिगत टीका आणि द्वेषाच्या राजकारणाला कधीच जागा नव्हती- सुप्रिया सुळे.

मुंबई: ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात सापडलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेत चौकशी केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. (ncp mp supriya sule criticizes modi govt and njp over actions by ed and cbi in maharashtra)

राज्यातील महाविकास आघाडी गेल्या दोन वर्षांपासून राज्यात अतिशय चांगले काम करत आहे हे जनता बघत आहे. आघाडीला लोकांचे प्रेमही मिळत आहे. मात्र, केंद्र सरकारच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करू न तपास यंत्रणांचा वापर केलेला मी कधीच पाहिलेला नाही. मी इतकी वर्षे आता सामाजिक जीवनात काम करत आहे, मात्र असा गैरवापर मी कधीच पाहिलेला नसल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

क्लिक करा आणि वाचा- सप्टेंबरमध्ये करोनाचे निर्बंध कडक होणार?; पालकमंत्री अस्लम शेख यांचे मोठे विधान

‘केवळ महिला घरी असताना कारवाई योग्य आहे का?’

अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी आणि त्यांच्या वकिलाला ताब्यात घेणे ही दुर्दैवी घटना आहे. घरात तीन महिला असताना अशी कारवाई होणे हे दुर्दैवी असेच आहे, असे सांगताना केवळ महिला घरात असताना सीबीआयने अशी कारवाई करणे योग्य आहे का, असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

‘महाराष्ट्रात द्वेषाच्या राजकारणाला कधीच जागा नव्हती’

राज्यात सुरू असलेल्या ईडी, सीबीआयच्या कारवाईवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात व्यक्तिगत दोषारोप आणि द्वेषाच्या राजकारणाला कधीही जागा नव्हती. आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. सीबीआय आणि ईडी या सरकारी यंत्रणा आहेत. मग असे असताना ईडीची माहिती इतर लोकांकडे कशी येते?, ही माहिती लिक कशी होते.

क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! कोवीन अ‍ॅप हॅक करून १६ जणांनी घेतली लस

‘सुडाचे राजकारण कधीही टिकणार नाही’

राज्यात हे सुडाचे राजकारण सुरू आहे. मात्र अशा प्रकारचे हे सुडाचे राजकारण कधीही टिकलेले नाही आणि पुढेही ते टिकणार नाही, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

क्लिक करा आणि वाचा- अभिनेत्री पायल रोहतगीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; काँग्रेस आक्रमक

Source link

Modi govtmp supriya sulesupriya sule criticizes bjpsupriya sule criticizes modi govtमोदी सरकारसुप्रिया सुळे
Comments (0)
Add Comment