उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळपासूनच पुण्यात विविध ठिकाणी दौरा सुरू आहे. पुण्यातल्या शासकीय ससून रुग्णालयात देखील विविध वॉर्डच उद्घाटन त्यांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्ताने अजित पवार गटाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. शासकीय रुग्णालयात नवीन इमारतीचे उद्घाटन असो किंवा तृतीयपंथीसाठी केलेल्या नवीन वार्ड त्याचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होत आहे. यादरम्यान त्यांच्यासोबत महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, सह भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील कांबळे हे उपस्थित होते.
आमदार सुनील कांबळे यांना ऑफ द रेकॉर्ड विचारला असता त्यांनी मारलं असल्याचं स्पष्ट बोलून दाखवलं आहे. ”त्या माणसाने मला दोन ते तीन वेळा धक्का दिला. म्हणून माझा राग अनावर झाला. त्याला दोन-तीन वेळा सांगून त्याने ऐकलं नाही, म्हणून त्याला मी त्याला मारलं, असं आमदार कांबळे यांनी यावेळी सांगितलं.
राष्ट्रवादी वैद्यकीय मदत पक्षाचे प्रमुख जितेंद्र सुरेश सातव हे म्हणाले, ”उपमुख्यमंत्री अजित पवार आमचे नेते आहेत. ते ससून रुग्णालयात कामाची पाहणी करणार असल्यामुळे मी गेले सात दिवस झाले या ससून रुग्णालयात कामाची पाहणी आणि आढावा घेत आहे. एवढ्या गर्दीमध्ये कोणाला धक्का लागणे हे साहजिक असतं. परंतू मारणे हे योग्य आहे का? असं थेट सातव म्हणाले आहेत. मात्र, कार्यक्रमानंतर राष्ट्रवादी भाजप विरोधात भूमिका घेईल का? किंवा आमदार सुनील शेळके काय बोलतील? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.