मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी देहूरोड परिसरातील वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? जाणून घ्या पर्याय मार्ग

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा शिवसंकल्प अभियान मेळावा मुकाई चौक, किवळे येथे आज, शनिवारी होणार आहे. या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याने देहूरोड, किवळे आणि परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या वाहतूक बदलाचे आदेश पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिले आहेत.

वाहतुकीतील हा बदल शनिवारी सकाळी नऊ ते रात्री बारापर्यंत असणार आहे. यातून पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन विभाग, पेट्रोल, डिझेल टँकर, पीएमपी बसेस, स्कूल बस आदी वाहने वगळण्यात आली आहेत.

असा असेल बदल

– मुकाई चौक ते आदर्शनगर हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. (कार्यक्रमासाठी येणारी वाहने वगळून).
– पर्यायी मार्ग – पुणे बाजूकडून आदर्शनगर येथे जाणाऱ्या वाहनांनी देहूरोड बाजार येथून विकासनगर मार्गे जावे.

– शिंदे पेट्रोलपंपाकडून मुकाई चौकाकडे जाणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. (कार्यक्रमासाठी येणारी वाहने वगळून)
– पर्यायी मार्ग – मुंबई कडून येणारी वाहने एच. पी. पेट्रोलपंप येथून डाव्या बाजूस सर्व्हिस रोडने
– समीर लॉन्स अंडरपास येथून डाव्या बाजूने वळून रावेत गावठाण मार्गे इच्छित स्थळी जातील.

– मुंबई एक्स्प्रेस वे वरून किवळे चौकात रावेत एक्झीट मधून येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद (कार्यक्रमासाठी येणारी वाहने वगळून)
– पर्यायी मार्ग – मुंबईकडून येणारी वाहने एच. पी. पेट्रोलपंप येथून डाव्या बाजूस सर्विस रोडने समीर लॉन्स अंडरपास येथून डाव्या बाजूने वळून रावेत गावठाण मार्गे इच्छित स्थळी जातील.

– पुणे कडून मुंबईकडे जाणारी वाहने समीर लॉन्स साईडने कृष्णा हॉटेल चौकाकडे जाण्यास सर्व वाहनांना बंदी राहील (कार्यक्रमासाठी येणारी वाहने वगळून)
– पर्यायी मार्ग- एक्स्प्रेस हायवेने मुंबईकडे जाता येईल.
– किवळे बस स्टँड ते विठ्ठल हॉटेल पंक्चरकडे जाणारा साईड रोड सर्व वाहनांसाठी बंद राहील. (कार्यक्रमासाठी येणारी वाहने वगळून)
– मावळा पुतळा ते विठ्ठल हॉटेल पंक्चर व कृष्णा चौक हॉटेल सेंटोसा पंक्चर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. (कार्यक्रमासाठी येणारी वाहने वगळून)
– किवळे गावाकडून येणारी सर्व प्रकारची वाहने कृष्णा हॉटेल चौकाकडे न येता समीर लॉन्स अंडरपास मार्ग इच्छित स्थळी जातील.

Source link

cm eknath shinde newsdehuroadPimpri Chinchwadpune traffic changes newspune traffic diversionpune traffic updatesदेहूरोड परिसरातील वाहतुकीत मोठे बदल
Comments (0)
Add Comment