मुंबईकरांनो लक्ष द्या! ९ जानेवारीला ‘या’ भागात कमी दाबाने पाणीपुरवठा, वाचा संपूर्ण लिस्ट

मुंबई : बोरिवली टेकडी जलाशयाच्या संरचनात्मक तपासणी कामामुळे ९ जानेवारी रोजी कांदिवली, बोरिवली, दहिसर भागातील काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पालिकेच्या आर/मध्य विभागातील संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य, बोरिवली टेकडी जलाशय क्रमांक २ ची संरचनात्मक तपासणी ९ जानेवारी रोजी दुपारी १ ते रात्री ९ वाजेपर्यंत (एकूण आठ तास) होणार आहे. या कामादरम्यान, बोरिवली टेकडी जलाशय क्रमांक २ रिक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे खालील परिसरांमध्ये पाणीपुरवठा हा फक्त बोरिवली टेकडी जलाशय क्रमांक ३ द्वारे करण्यात येणार आहे. या संरचनात्मक तपासणीमुळे पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.
बोगद्यास मंजुरीची प्रतीक्षा; ठाणे-बोरिवली प्रकल्पास पर्यावरण मंत्रालयाची अद्याप परवानगी नाही
कांदिवली आर/दक्षिण
महिंद्रा आणि महिंद्रा, गुंदेचा ठाकूर गाव व समतानगर-सरोवा संकुल, कांदिवली पूर्व (पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ६.२५ ते रात्री ८.२५)

बोरिवली आर/मध्य
ला-बेल्लेजा व ला-वेस्टा, बोरिवली पूर्व (पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.३० ते सायंकाळी ७.३०)

दहिसर आर/उत्तर

शिव वल्लभ मार्ग (उत्तर बाजू), मारुतीनगर, रावळपाडा, एन. जी. उद्यान, रिव्हर उद्यान, गावडेनगर, भोईरनगर, मिनीनगर, एस. एन. दुबे मार्ग, संत कबीर मार्ग, ज्ञानेश्वरनगर, कोकणीपाडा, संत नामदेव मार्ग, वाघदेवीनगर, केशवनगर, राधाकृष्णनगर, धारखाडी, सुहासिनी पावसकर मार्ग, मेंदोडा कुंपण, भोईर कुंपण, सिद्धनाथ मिश्रा कुंपण, संत मीराबाई मार्ग, राज नगर, सुयोगनगर, वैशालीनगर, नरेंद्र संकुल, केतकीपाडा (अंशत:), एकतानगर, दहिसर टेलिफोन एक्स्चेंज, घरटनपाडा क्रमांक १ व २, गणेश मंदिर मार्ग, अष्टविनायक चाळ, दहिसर (पूर्व). (पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.४० ते सायंकाळी ७.४०)

दहिसर आर/उत्तर

आनंद नगर, आशीष संकुल, एन. एल. संकुल, वीर संभाजीनगर, भाबलीपाडा, परागनगर, लिंक मार्ग, गोवण मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज संकुल, सुधींद्रनगर, देवयानी संकुल, महालक्ष्मी आणि सरस्वती संकुल, शक्तिनगर, सद्गुरू छाया लेऊट बंगाली पाडा, महाकाली वाडी, मातृछाया गल्ली, दहिसर भूयारी मार्ग, आनंदनगर (अंशत:), तरे कुंपण, अवधूतनगर, वर्धमान औद्योगिक परिसर, सी. एस. मार्ग, दहिसर पोलिस स्थानक परिसर, किसाननगर, वर्धमान औद्यगिक परिसर, डायमंड इंडस्ट्री, नॅशनल मील कुंपण, रामाणी कुंपण, केतकीपाडा ऑनलाइन पंपिंग, दहिसर पूर्व (पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ८.४५ ते रात्री ११.३०)

Source link

borivali water supplydahisar areakandivali water supplymumbai newsmumbai water supplymumbai water supply system
Comments (0)
Add Comment