लोकप्रियता मिळवण्यासाठी बेताल वक्तव्य, जितेंद्र आव्हाडांचा DNA तपासा; गिरीश महाजनांची टीका

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक: निवडणुका जवळ आल्याने जितेंद्र आव्हाड यांच्या पायाखालची वाळू सरकली असून, सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी ते बेताल वक्तव्य करीत आहेत. यांना कोणी विचारत नसल्याने यानिमित्ताने तरी आपण चर्चेत राहू, यासाठी हा खटाटोप आहे. जितेंद्र आव्हाडांचा डीएनए तपासण्याची गरज असल्याचे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले.

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या लोगो अनावरण प्रसंगी शुक्रवारी ते पत्रकारांशी बोलत होते. महाजन म्हणाले की, प्रसिद्धीच्या आसुयेपोटी ते बडबड करीत आहेत. राजकारण करताना कोणत्या पातळीपर्यंत जायचे याचे त्यांना भान नाही. खालच्या स्तरापर्यंत जाऊन ते बोलत आहेत. त्यांच्या वक्तव्याबाबत उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

महाजन म्हणाले..

– कांदा निर्यातीबाबत तातडीने चर्चा करून मार्ग काढला जाईल. शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागणार नाही, याची ग्वाही देतो.

– मराठा आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल लवकरच समोर येईल. आम्हाला टिकणारे आरक्षण द्यायचे आहे. त्यामुळे थोडा वेळ लागत आहे.

– मागील सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण मिळवून दिले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांना ते टिकवता आले नाही.

– बारामती ॲग्रो कंपनीवर ‘न खाऊंगा न खाने दुंगा’ या मोदींच्या उक्तीनुसार कारवाई करण्यात आली आहे. कोणतीही कारवाई अचानक होत नसते. काहीतरी गोंधळ असेल.
शरद पवार रोहित पवारांचा फोटो पोस्ट,”घरभेदी” सामील याचं वाईट…, ईडीच्या छापेमारीवर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट
– आताच या आघाडीचे तीनतेरा वाजले आहेत. नेतृत्व कोण करतो, यावर भांडणे आहेत.

– जनमत मोदींच्या पाठिशी असल्याने अशा कितीही आघाड्या झाल्या, तरी त्या तग धरणार नाहीत.

– संजय राऊत कायमच सगळ्यांना शिव्या घालतात. त्यांच्यावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही.

– येत्या आठ ते पंधरा दिवसांत राज्याच्या राजकारणात भूकंप होईल.

Source link

Girish MahajanGirish Mahajan On Jitendra AwhadJitendra AwhadNashik newsnashik political newsराष्ट्रीय युवा महोत्सव
Comments (0)
Add Comment