एकच लक्ष्य मिशन दिल्ली, उदय सामंतांच्या भावासाठी पोस्टरबाजी, जागावाटपाआधीच ‘भावी खासदारपद’

अनंत पाताडे, सिंधुदुर्ग : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात रस्सीखेच सुरुच आहे. दोन्ही पक्ष आमचाच उमेदवार असला पाहिजे, असे दावे प्रतिदावे करत आहेत. मात्र शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सिंधुदुर्गामध्ये लावलेला बॅनर लक्षवेधी ठरला आहे. त्यामुळे जिल्ह्यात चर्चेला अधिकच उधाण आले आहे. मात्र दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर लोकसभा उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झालेली नसून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळणार अशा आशयाचे बॅनर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात लावण्यात आले आहेत.

भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची गेल्या आठवड्यात बैठक झाली, तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भावी’ खासदारांना सुनावले. ‘काही ठिकाणी ‘तसे’ बोर्ड लागत आहेत; पण कोणी स्वत:ला ‘भावी’ वगैरे समजत असेल तर त्याचा करेक्ट कार्यक्रम झालाच म्हणून समजा’, – या फडणवीसांच्या वाक्यातला गर्भितार्थ महत्त्वाचा आहे. भाजपसाठी ‘मोदी की गॅरेंटी’ ही महत्त्वाची घोषणा आहे; पण भाजपच्या लोकसभा उमेदवारीची गॅरंटी आज कोणीही देऊ शकत नाही. ‘पुढचा खासदार मीच’ असे छातीठोकपणे सांगणे आजतरी जोखमीचे आहे. त्यामुळे सामंत हे उमेदवारीचे बाशिंग बांधून असले, तरी त्यांना भाजप आणि शिंदे गटाकडून संधी मिळणार का? असा प्रश्न समोर ठाकला आहे.

‘जम्पिंग जॅक’ बाळ्यामामा म्हात्रेंची सातवी राजकीय उडी, पवारांचा शिंदेंना जबर धक्का, भिवंडीत ताकद वाढली
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून खासदारकीच्या उमेदवारीसंदर्भात अनेक दावे केले जात आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून प्रामुख्याने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे नाव पुढे आहे. तर भाजपकडून प्रमोद जठार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. तर उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांनीही आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

भाजपच्या ७० नेत्यांचं पुण्यात मंथन, २५ लोकसभा उमेदवारांबाबत चर्चा, कोणती जागा कोणाला?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल असा मोठा दावा केला होता. मात्र, यानंतर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई – गोवा महामार्गावर किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसाचे बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर “एकच लक्ष मिशन दिल्ली” असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर कोणाचा उमेदवार असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

रवींद्र चव्हाण मोठ्या भावासारखे, महायुतीकडून त्यांना उमेदवारी मिळाली तर मी त्यांचा प्रचार करेन | किरण सामंत

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Source link

kiran samantloksabha election 2024ratnagiri sindhudurg loksabha constituencyuday samant brotherउदय सामंतकिरण सामंतरत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघलोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment