राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नागपूर येथे विविध पदांची भरती, आजच करा अर्ज

NHM Nagpur Recruitment 2024: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नागपूर येथे विविध संवर्गातील अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांचा समावेश आहे.

नागपूर जिल्हा परिषदेने नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून ०९ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि वेतन याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
कीटकशास्त्रज्ञ – ०५ जागा
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – ०५ जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १० जागा
एकूण रिक्त पदसंख्या – २० जागा

शैक्षणिक पात्रता –
कीटकशास्त्रज्ञ – एमएससी झुओलॉजी (M.Sc Zoology With 5 Years Experience)
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – वैद्यकीय शिक्षण पदवीधर ( Any Medical graduate with MPH/MHA/MBA in Health)
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – बारावी आणि संबधित विषयातील डिप्लोमा

वेतन –
कीटकशास्त्रज्ञ – ४० हजार
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – ३५ हजार
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १७ हजार

नोकरी ठिकाण – तालुका काटोल, रामटेक, भिवापूर, मौदा, नरखेड (सावरगाव)

अर्ज पद्धती – ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०९ जानेवारी २०२४

भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘जिल्हा परिषद नागपूर’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ०९ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.

Source link

NHM Bharti 2024NHM Nagpur Recruitment 2024NHM Recruitment 2024recruitmentराष्ट्रीय आरोग्य अभियान २०२३
Comments (0)
Add Comment