अजितदादा मित्र मंडळाचे नेते…; रोहित पवारांकडून उल्लेख, ईडीच्या धाडीवरुनही समाचार

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्या कंपन्यांवर ईडीची धाड पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी घाबरत असतो तर परदेशातून परत आलोच नसतो, असं रोहित पवार म्हणाले. विशेष म्हणजे अजित पवार गटाबद्दल बोलताना रोहित पवारांनी “अजितदादा पवार मित्र मंडळ” असा उल्लेख केला. पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमानिमित्त रोहित पवार आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी रोहित पवार म्हणाले की, यापूर्वीच्या अशा घटना आहेत. ज्यावेळी ईडीची धाड पडल्यानंतर एक तर ती व्यक्ती बाहेर देशात गेली आहे किंवा दुसऱ्या पक्षात गेली आहे. परंतु मी काल ईडीची धाड पडल्यानंतरही आज भारतात आलो. यामध्ये ईडी अधिकाऱ्यांची कोणतीही चूक नाहीये. त्यांना वरून ज्या प्रकारे सांगण्यात येतं, त्याचप्रमाणे त्यांना काम करावं लागतं. त्यामुळे आमची ईडीच्या अधिकाऱ्यांवर नाराजी नसल्याचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

२२ जानेवारीला राम मंदिर उद्घाटनास अयोध्येला जाणार का? उद्धव ठाकरे यांनी सांगितला प्लॅन
पुढे अजित पवार यांच्या गटाला अजितदादा मित्र मंडळ असा देखील उल्लेख रोहित पवार यांनी केला आहे.

यंदाची निवडणूक बहुदा शेवटची, काँग्रेस खासदार शशी थरुर यांचे राजकीय संन्यासाचे संकेत

काय म्हणाले रोहित पवार?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या पक्षाबद्दल जास्त बोलावं, त्यांना अहंकार का येतो? एक तर शिंदे गटाला १३ सीट्स दिल्या आहेत. त्यातले ८ विद्यमान खासदार म्हणतात की मला शिंदे गटाच्या चिन्हावर लढायचं नाही, मला भाजपच्या चिन्हावर लढायचं आहे. अजितदादा मित्र मंडळाचे काही जणही असंच बोलत आहेत. त्यामुळे बावनकुळेंना असं वाटत असेल, की दोन शक्तींना, त्यांच्या खासदार-उमेदवारांना असं वाटतं की आपण भाजपच्या चिन्हावर लढावं, म्हणून त्यांच्या मनात अहंकार जागा झाला असावा, असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार काय बोलतात, त्याला फार महत्व देत नाही; जितेंद्र आव्हाडांचा पलटवार

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Source link

ajit pawarajitdada mitra mandalbaramati agro company ed raidRohit Pawarrohit pawar ed raidअजित पवारअजितदादा मित्रमंडळबारामती अॅग्रो कंपनी ईडी धाडरोहित पवाररोहित पवार ईडी धाड
Comments (0)
Add Comment