ठाणे महानगरपालिकेत मोठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

Thane Mahanagarpalika Recruitment 2024: ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील ११८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पालिकेने नुकतीच याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

या भरतीमध्ये पल्मोनरी लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन, ऑडिओमेट्री टेक्निशियन, वॉर्ड क्लर्क, अल्ट्रा सोनोग्राफी / सीटी. स्कॅन तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ अशा विविध विभागातील टेक्निशियन पदांचा समावेश आहे. या पदांकरिता इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. या मुलाखती पदानुसार १५ ते १९ जानेवारी दरम्यान होणार आहे. तेव्हा या भरतीचे सर्व तपशील जाणून घेऊया.

‘ठाणे महानगरपालिका आरोग्य कर्मचारी भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
पल्मोनरी लॅब टेक्निशियन – ०१ जागा
ईसीजी टेक्निशियन – १४ जागा
ऑडिओमेट्री टेक्निशियन – ०१ जागा
वॉर्ड क्लर्क – १२ जागा
अल्ट्रा सोनोग्राफी / सीटी. स्कॅन तंत्रज्ञ – ०१ जागा
क्ष-किरण तंत्रज्ञ – १२ जागा
सहायक क्ष-किरण तंत्रज्ञ – ०५ जागा
मशीन तंत्रज्ञ – ०१ जागा
दंत तंत्रज्ञ – ०३ जागा
ज्युनिअर टेक्निशियन – ४१ जागा
सिनिअर टेक्निशियन – ११ जागा
ई.ई.जी. टेक्निशियन – ०१ जागा
ब्लड बैंक टेक्निशियन – १० जागा
प्रोस्टेटिक व ऑयोटिक टेक्निशियन – ०१ जागा
एंडोस्कोपी टेक्निशियन – ०२ जागा
ऑडीओकिन्युजल टेक्निशियन – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ११८ जागा

शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्याचे विस्तृत तपशील जाहिरातीत नमूद केले आहेत. जाहिरात वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.

वेतन –
सर्व पदांसाठी – २५ हजार (मासिक)

नोकरी ठिकाण – ठाणे

निवड प्रक्रिया – मुलाखती द्वारे

मुलाखतीचा पत्ता – अरविंद कृष्णजी पेंडसे सभागृह, प्रशासकीय भवन, पाचपाखाड, ठाणे

मुलाखतीची तारीख – पदानुसार १५, १६, १८, १९ जानेवारी २०२४

भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘ठाणे महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

recruitmentThane Mahanagarpalika Recruitment 2024Thane municipal corporationThane Municipal Corporation Recruitment 202४ठाणे महानगरपालिका भरती २०२३ठाणे महापालिका भरती २०२४
Comments (0)
Add Comment