iQOO Neo 9 Pro अॅमेझॉन लिस्टिंग
आगामी नियो ९ प्रो स्मार्टफोन मायक्रो-साइट अॅमेझॉन इंडियावर लाइव्ह झाला आहे, त्यामुळे हा डिवाइस ह्याच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून विकला जाईल हे स्पष्ट झालं आहे. हा स्मार्टफोन iQOO इंडियाच्या ऑनलाइन स्टोरवर देखील उपलब्ध होईल. लिस्टिंगनुसार मोबाइलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट असेल. मायक्रो साइटवर प्रीमियम लेदर फिनिशसह ड्युअल-टोन व्हेरिएंट दिसला आहे. iQOO Neo 9 Pro स्मार्टफोनच्या रियर पॅनलवर दोन सर्कुलर कॅमेरा रिंग मिळतो. तसेच डिवाइसच्या उजवीकडे पावर आणि वॉल्यूम बटन आहे.
iQOO Neo 9 Pro ची लीक किंमत
टिपस्टर योगेश बरारनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर iQOO Neo 9 Pro ची किंमत पोस्ट केली आहे. फोन ४०,००० रुपयांच्या बजेटमध्ये भारतीय बाजारात सादर असू शकतो. त्याचबरोबर डिवाइस फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यात येऊ शकतो.
iQOO Neo 9 Pro चे स्पेसिफिकेशन्स
iQOO Neo 9 Pro मध्ये ६.७८ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले मिळू शकतो. ह्यावर २८०० x १२६० पिक्सल रिजॉल्यूशन, एचडीआर १० टेक्नॉलॉजी आणि १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये कंपनी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट आणि एड्रिनो ७४० जीपीयू देईल. डिवाइस १६जीबी पर्यंत एलपीडीडीआर५एक्स रॅम आणि १ टीबी यूएफएस ४.० इंटरनल स्टोरेजसह येऊ शकतो. हा फ्लॅगशिप फोन भारतात लेटेस्ट अँड्रॉइड १४ आधारित फनटच ओएस १४ वर आधारित असू शकतो.
iQOO Neo 9 Pro मध्ये ड्युअल रियर कॅमेरा ओआयएस सपोर्टसह मिळेल. ज्यात ५० मेगापिक्सलचा सोनी व्हीसीएस आयएमएक्स९२० सेन्सर आणि ५० मेगापिक्सलचा दुसरं कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. iQOO Neo 9 Pro फोन ५१६०एमएएचची बॅटरी आणि १२०वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह लाँच होऊ शकतो. हा फोन ड्युअल सिम ५जी, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, वाय-फाय ७, ब्लूटूथ, यूएसबी टाइप सी सपोर्ट सारखे अनेक फीचर्स दिले जाऊ शकतात.