विद्यार्थ्यांनी तयारी आणि परीक्षेच्या काळात योग्य आहार घेतला नाही, तर त्याचा आरोग्य आणि अभ्यासवरही विपरीत परिणाम होतो. कारण, पोट भरलेले राहून जेवणात पौष्टिकता असेल तर शरीराला अनेक फायदे होतात. येथे जाणून घ्या बोर्डाच्या परीक्षेदरम्यान मुलांनी कोणते खाणे टाळावे…
तणावामुळे भूकेवर परिणाम होतो :
बहुतांश मुले परीक्षेच्या वेळी तणावात राहतात. यामुळे भूक वाढते किंवा कमी होते. अशा परिस्थितीत अनेक मुले एकतर नीट जेवत नाहीत किंवा परीक्षेच्या तणावाखाली विचित्र पदार्थ खातात. अशा स्थितीत, न खाण्यापेक्षा काहीतरी खाणे चांगले आहे हे पालकांनाही पटवून देता येत नाही. मूल काहीतरी खात आहे, परंतु ते मुलाच्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही, कारण ते शरीरात ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे असे अन्नपदार्थ आणि Junk Food खाणे टाळावे. अनेक वेळा मुलांना भूक लागत नाही, पण ते अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यामुळे मुलांना वेळोवेळी काहीतरी योग्य खायला देत राहा. भूक लागली नसली तरी काही ना काही खात राहणे चांगले.
प्रथिनेयुक्त आहार घ्या :
परिक्षेच्या वेळी मुलांना दूध, चीज, टोफू सारखे दुग्धजन्य पदार्थ द्या. याशिवाय अंडी, संपूर्ण धान्य, हिरव्या भाज्या यांसारखे प्रथिनेयुक्त पदार्थ आरोग्यासाठी परिपूर्ण असतात. कार्बोहायड्रेट कमी खा, कारण यामुळे तुम्हाला कधी कधी झोप येते. फॅट दूध, म्युसली, अंडी, अंडी आणि टोस्ट, दही, ओट्स, केळी, सफरचंद, नाचणी किंवा रवा डोसा, इडली, पपई, ड्रायफ्रुट्स असे अनेक खाद्यपदार्थ तुम्ही मुलांना देऊ शकता. याशिवाय घरी शिजवलेले ताजे अन्न खाणे केव्हाही योग्य. कधीही रिकाम्या पोटी परीक्षेला जाऊ नका. घरी बनवलेला निरोगी नाश्ता करा आणि जा.
पॅकेज्ड फूड नकोच :
जर तुमची मुले चिप्स, कोल्ड्रिंक्स, नूडल्स यांसारखे अनारोग्यकारक पदार्थ खात असतील तर असे पदार्थ खने टाळा. मुलाला भूक लागल्यास मखना, शेंगदाणे, घरगुती चिवडा,तांदूळ लाडू, ड्रायफ्रुट्स, भाजलेले वाटाणे, भाजलेले हरभरे असे पदार्थ मुलाच्या टेबलाजवळ ठेवा.
या गोष्टींना नाही म्हणा :
परीक्षेच्या काळात पिझ्झा, बर्गर आणि सर्व प्रकारचे जंक फूड टाळा. यामुळे आरोग्याची हानी होते. जास्त नसेल तर परीक्षा संपेपर्यंत त्यांच्यापासून अंतर ठेवा. मैद्यापासून बनवलेले पदार्थ टाळा, स्निग्ध, खूप गोड आणि तळलेले पदार्थ टाळा.