२६ वर्षीय तरुणाला हवेत हार्ट अटॅक; पुण्याहून लखनऊला जाणारं विमान नागपुरात एमर्जन्सी लँड अन्…

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: पुणे-लखनऊ विमानाने प्रवास करणाऱ्या २६ वर्षीय तरुणाला प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका आला. वैद्यकीय एमर्जन्सी लक्षात घेत या विमानाचे नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लॅण्डिंग करण्यात आले. हार्ट अटॅक आलेल्या तरुणाचे नाव मोहम्मद अहेमद अन्सारी असे आहे. आज शनिवारी ६ जानेवारीला ही घटना घडली.

इंडिगो एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक ६ ई ३३८ या विमानाने नियोजित वेळेनुसार पुणे येथून लखनऊसाठी उड्डाण भरले. प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळातच मोहम्मद अहेमद अन्सारी या तरुणाच्या छातीत दुखू लागले. त्याची प्रकृती लक्षात घेत. आपत्कालीन लॅण्डिंगसाठी नागपूर विमानतळाशी संपर्क साधण्यात आला.

त्यानुसार, येथे आपत्कालीन लॅण्डिंग करण्यात आले. विमानातळावर तैनात असलेल्या किम्स किंग्जवे रुग्णालयाच्या वैद्यकीय चमुने तरुणाची पाहणी करून तात्काळ रुग्णालयात भरती केले. सध्या त्याच्यावर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शैलेंद्र गांजेवार यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Sharad Mohol: ९ वर्ष तुरुंगात, अनेक प्रकरणांमध्ये नाव, ड्रायव्हर ते कुख्यात गँगस्टर कसा बनला शरद मोहोळ?
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

flight emergency landingheart attackheart attack on flightindigo pune-lacknow flightNagpurnagpur news todayReturn On Equity
Comments (0)
Add Comment