सोन्या-चांदीच्या ऐवजासह दीडशे कबूतरं पळवली; चोरीच्या घटनेनं गावकरी हैराण, तपास सुरू

दौंड: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. तब्बल २७ तोळे सोने आणि चक्क दीडशे कबूतर चोरून नेले आहेत. दौंड तालुक्यातील कुरकुंभ दौंड रस्त्यालगत असणाऱ्या भागवतवस्ती आणि चोरमलेवस्ती, गोकुळनगर या ठिकाणी शुक्रवारी मध्यरात्री या चोरीचा प्रकार घडला.
SBIची नवी शाखा सुरू, सगळं नीट चाललेलं असताना ग्राहकाला शंका; तपासातून भलताच प्रकार उघडकीस
भागवतवस्ती येथील बंद बंगला काही अज्ञात चोरट्यांनी फोडून बंगल्यातील तब्बल २७ तोळे सोने आणि रोख रक्कम चोरून नेली. तसेच येथील चोरमलेवस्ती आणि गोकुळनगर या दोन ठिकाणीही अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. यापैकी एका ठिकाणाहून चोरट्यांनी चक्क दीडशे कबूतर चोरून नेले. चोरी झाल्यावर त्यांनी येथील घराची कडी लावून चोरटे पसार झाले. भागवतवस्ती येथे दिलीप भागवत यांचे घर आहे. भागवत हे कुटुंबीयांसह त्यांच्या आजारी बहिणीला पाहण्यासाठी गोवा येथे गेले होते.

महाराष्ट्रात राम राज्य आहे का? शिंदेंनी राजधर्माचं पालन करावं; पडळकरांची सरकारवर टीका

भागवत हे त्यांच्या फौजी हॉटेलमध्ये होते. घरी कोणीही नसल्याने अज्ञात चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडले. मात्र तो दरवाजा आतून बंद असल्याने उघडला गेला नाही. त्यानंतर त्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे दरवाजे उचकटून सोन्याच्या वस्तू आणि रोख रक्कम चोरून नेल्या. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंडचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर चोरी प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Source link

daund newsdaund theft newspigeons stolen in daundकबूतर चोरीलादौंड चोरी बातमीदौंड बातमीपुणे बातमी
Comments (0)
Add Comment