तुम्ही लवकर बऱ्या व्हा, हल्लेखोरांवर कारवाई होणारच; मुख्यमंत्र्यांचा कल्पिता पिंपळेंना फोन

हायलाइट्स:

  • फेरीवाल्यानं केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे जखमी
  • मुख्यमंत्र्यांनी साधला पिंपळेंशी संवाद
  • मुख्यमंत्र्यांनी कल्पिता पिंपळेंना दिला शब्द

ठाणेः ठाणे महापालिकेच्या माजिवाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे (kalpita pingale) यांच्याशी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Cm Uddhav Thackeray) फोनद्वारे संवाद साधला आहे. ‘आरोपींना कडक शिक्षा होईल, काळजी करु नका. तुम्ही ठणठणीत बऱ्या व्हा,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कल्पिता पिंपळेना धीर दिला आहे.

ठाणे महापालिकेच्या माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनधिकृत फेरीवाल्यानं काहि दिवसांपूर्वी हल्ला केला. या हल्ल्यात कल्पिता पिंगळेंची दोन बोटं छाटली गेली. तर, त्यांच्या अंगरक्षकाने एक बोट गमावले आहे. कल्पिता पिंगळे यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोन करुन पिंगळेंच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. तसंच, त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई होणारचं, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

महापौरांच्या फोनवरुन मुख्यमंत्र्यांनी पिंपळे यांच्याशी संवाद साधला, यावेळी त्यांनी, ‘तुमचं कोणत्या शब्दांत कौतुक करावं. मी तुम्हाला शब्द देतो की तुम्ही बरे झाल्यानंतर कारवाई करणार म्हणत आहात. पण आता ती जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. तुम्ही चिंता करु नका, लवकर ठणठणीत बरे व्हा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; नेटकरी म्हणाले…

‘मला रोज तुमच्या तब्येतीबाबत अहवाल येत असतो. पण उगाच डिस्टर्ब नको म्हणून मी लवकर संपर्क साधला नाही. पण मला माहिती मिळत असते. तुम्ही लवकर बऱ्या व्हा. बाकी आम्ही बघू. आरोपींना कठोर शासन होणार,’ असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

पिंपळेंच्या अंगरक्षकाने गमावले बोट

ठाणे महापालिकेच्या माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या वेळी त्यांच्या बचावासाठी धावलेल्या अंगरक्षक सोमनाथ पालवे यांचे तुटलेले बोट जोडण्यात अपयश आले आहे. हे अर्धवट तुटलेले हे बोट मृतप्राय झाल्याने ते जोडणे शक्य नसल्याचे डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पालवेंनी डाव्या हाताचे अंगठ्याच्या बाजूचे अर्धे बोट कायमचे गमावले आहे. परंतु हल्लेखोराला लाथ मारून पाडल्यामुळे पिंपळे यांच्यावरील धोका टाळण्यात यश मिळाल्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया पालवे यांनी ‘मटा’कडे व्यक्त केली.

बेळगाव महापालिकेची निवडणूक; संजय राऊतांनी केला ‘हा’ दावा

Source link

cm uddhav thackeraykalpita pimple health updatekalpita pimple latest newsmunicipal co-commissioner kalpita pimpleकल्पिता पिंपळेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Comments (0)
Add Comment