दोन विद्यार्थी शाळेत निघाले; मात्र वाटेतच नियतीनं डाव साधला, मुलगा गेल्यानं कुटुंब हळहळलं

दौंड: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत निघालेल्या शाळकरी मुलांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोराची धडक दिल्याने एका विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळी साडेसातच्या सुमारास बारामती पाटस रोडवरील बोबडे यांच्या खडी क्रशर समोर हा अपघात घडला.
चिमुकलीचे अपहरण; पोलिसांचे शोधकार्य, तपासाचे धागेदोरे भिकारी महिलेपर्यंत पोहोचले, चौकशीत धक्कादायक सत्य समोर
मिळालेल्या माहितीनुसार, गोरक्षनाथ भीमराव बंडलकर (१६ ) याचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर ऋषिकेश रमेश बंडलकर (१६, दोघे रा. हिंगणी गाडा तालुका दौंड जिल्हा पुणे) हा गंभीर जखमी झाला आहे. गोरक्षनाथ आणि ऋषिकेश हे दोघेही इयत्ता दहावीत शिकत असून ते दौंड तालुक्यातील वासुंदे येथील श्री गुरुकृपा माध्यमिक विद्यालयात शनिवारी सकाळची शाळा असल्याने दुचाकीवरून शाळेत निघाले होते. यावेळी भरधाव वेगाने पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात दोघांनाही गंभीर मार लागल्याने ते जखमी झाले. अपघातानंतर गोरक्षनाथ बंडलकर याला बारामतीतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ओबीसीतून मराठा आरक्षण मिळणार नाही, मंत्री पदाची, आमदारकीची परवा करत नाही; भुजबळांनी स्पष्टचं सांगितलं

मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ऋषिकेश भंडलकर याला पाटस येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातानंतर पालकांसह ग्रामस्थांनी पाटस बारामती रस्ता आडवत रास्ता रोको केला. घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस हवालदार भानुदास बंडगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांची समजूत काढली. अपघातात भरधाव वेगाने धडक देणाऱ्या दुचाकीस्वार ही जखमी झाला आहे. याबाबत पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू आहे.

Source link

daund accidentdaund newsPune newsदौंड अपघात बातमीपुणे अपघातपुणे बातमी
Comments (0)
Add Comment