पत्नीला भेटायला आलेला दुचाकी चोर जाळ्यात; पोलिसांच्या हाती लागलं ‘हे’ घबाड

हायलाइट्स:

  • सराईत दुचाकी चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात
  • पत्नीला भेटायला हडपसरमध्ये आला असताना झाली अटक
  • शंकर देवकुळेवर दाखल आहेत १४ गुन्हे

म. टा. प्रतिनिधी । पुणे

शहरात दुचाकींची चोरी करणारा एक सराईत सीसीटीव्हीत दिसला होता. पण, तो पोलिसांना गुंगारा देत विविध ठिकाणे बदलत होता. तो हडपसर परिसरात राहणाऱ्या पत्नी व मुलीला भेटण्यासाठी आला आणि पोलिसांच्या सापळ्यात अडकला. त्याला गुन्हे शाखा युनिट पाचने अटक करून त्याच्याकडून चोरीच्या १८ दुचाकी जप्त केल्या आहेत. (Pune Police arrested Bike Thief In Hadapsar)

शंकर भरत देवकुळे (वय २८, सध्या- रा. खामसवाडी, ता. तुळजापूर मूळ- उस्मानाबाद) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून पुणे शहरातील ११, पिंपरी चिंचवड आयुक्तालय तीन, नगर एक आणि पुणे ग्रामीण एक असे १६ गुन्हे उघडकीस आले आहेत. देवकुळे हा दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्यावर पूर्वीचे १४ गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली.

वाचा: कुटुंबातील सगळे लोक घरात असताना चोर शिरला, चोरी केली आणि…

वाचा:
…म्हणून मंदिरं उघडता येत नाहीयेत; अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

शहरात दररोज वाहन चोरीच्या घटनांचे सत्र सुरू आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहनचोरांचा माग काढण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखा युनिट पाचकडून वाहन चोरीचा माग काढताना काही ठिकाणी आरोपीचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले होते. सीसीटीव्हीत दिसलेला आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्यामुळे त्याची ओळख लगेचच पटली. पण, तो पोलिसांना सापडत नव्हता. तो हडपसर परिसरात असलेल्या पत्नीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक हेमंत पाटील यांनी घोरपडी परिसरात त्याला पकडले. त्याला अटक करून तपास केल्यानंतर त्याने चोरलेल्या १८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

वाचा:स्टिंग ऑपरेशन करणं काँगेस नेत्याच्या अंगलट; विनयभंगाचा गुन्हा दाखल

Source link

HadapsarPune crime newsPune Police Arrested Bike Thiefपुणेहडपसरमध्ये दुचाकी चोर ताब्यात
Comments (0)
Add Comment