मुंबई : अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिराचे २२ जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळणार का? मिळाल्यास ते उपस्थिती लावणार का, याबाबत सर्वांना उत्सुकता होती. मात्र २२ जानेवारीला ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात उपस्थित राहणार असून गोदावरीच्या तीरावर महाआरती देखील करणार आहेत.
“बाबरी पाडल्यानंतर २५-३० वर्षांनी न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूला निकाल दिला. २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. आम्ही २२ जानेवारीला नाशिकमधील काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहोत. प्रभू रामचंद्र काही वर्ष पंचवटीला देखील वास्तव्यास होते. त्यामुळे त्या दिवशी नाशकात गोदावरीच्या तीरावर एक महाआरती देखील होईल. काळाराम मंदिरासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांनी संघर्ष केला होता.” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने शिवाजी पार्क येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
२३ जानेवारीला हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. यावर्षी २३ जानेवारीला शिवसेनेचे शिबीर होणार आहे. त्याच दिवशी रात्री अनंत कान्हेरे मैदानावर शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे.
अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा धार्मिक आणि अस्मितेचा असावा. हा अभिमान, अस्मिता आणि आनंदाचा क्षण आहे. या सोहळ्याला कोणताही राजकीय रंग देऊ नये. राम आमचा आहे. आम्ही केव्हाही अयोध्येला जाऊ शकतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Read Latest Maharashtra Updates And Marathi News