Nitesh Rane Writes Letter To Cm: राणेंच्या टीकेनंतर आता नितेश राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

हायलाइट्स:

  • आमदार नितेश राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र.
  • बॅडमिंटन कोर्ट आणि स्विमिंग पुलाच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा.
  • खासगीकरणात महापौर किशोरी पेडणेकरांना रस- नितेश राणे यांचा आरोप.

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर राणे यांना झालेली अटक आणि महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या नेत्यांवर राणे कुटुंबीयांनी केलेल्या टीकेनंतर आता राणे यांचे पुत्र, आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे नितेश राणे यांनी मुलुंड क्रीडा संकुल आणि अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्ट आणि स्विमिंग पुलाच्या खासगीकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. (mla nitesh rane writes a letter to cm uddhav thackeray)

या दोन्ही क्रीडा संकुलातील बॅडमिंटन कोर्ट आणि स्विमिंग पुलाचे करण्याचा घाट घातल्याचे सांगत नितेश राणे यांनी त्याला विरोध दर्शवला आहे. या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुलुंडमधील क्रीडा संकुलाचा तरण तलावाचा आणि अंधेरीतील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलाचा कारभार हा ललित कला प्रतिष्ठानमार्फत केला जातो. मात्र, प्रतिष्ठानची स्थापना केल्यानंतर यात पारदर्शकता राहावी असा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आग्रह होता. म्हणून यावर महापालीकेचे नियंत्रण असावे असे त्यांना वाटत होते. हे लक्षात घेऊनच शिवसेनाप्रमुखांनी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष महापौर आणि उपाध्यक्ष महापालिका आयुक्त असतील अशी तजवीज केली. यात कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचाही सदस्य म्हणून समावेश केला. यामागे बाळासाहेबाचा हेतू स्पष्ट व स्वच्छ होता असे सांगताना आता मात्र तसे राहिले नाही, असे टीकास्त्र नितेश राणे यांनी सोडले आहे.

क्लिक करा आणि वाचा- संजय राऊत यांना सगळं कळतं, ते जगाचे नेते आहेत; चंद्रकांत पाटील यांचा टोला

नितेश राणे यांचा महापौरावर निशाणा

ललित कला प्रतिष्ठानवर देवेंद्रकुमार जैन यांची विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) म्हणून नियुक्ती झाल्यानंतर स्विमिंग पूल आणि बॅडमिंटन कोर्टच्या खासगीकरणाचा प्रयत्न सुरू झाला आहे हे लक्षात घेणे आवश्यक असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. देवेंद्र कुमार जैन हे महापौरांचेही ओएसडी आहेत. याचा अर्थ महापौरांचा या खासगीकरणात इंटरेस्ट असल्याशिवाय या खासगीकरण होणे शक्य नाही, असा थेट आरोप नितेश राणे यांनी महापौरांवर केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- आता बस्स, कंटाळलो! भरत जाधव यांचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा

जैन हे कुणाच्या निर्देशावरून खासगीकरण करायला निघाले आहेत असा सवाल उपस्थित करत मुंबईकरांच्या हक्काचा जलतरण तलाव आणि बॅडमिंटन कोर्ट ते कुणाच्या घशात घालणार आहेत तेही अगोदरच ठरले आहे, अशी चर्चा ऐकायला मिळत असल्याचे राणे यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- गणेशोत्सवाच्या तोंडावर रत्नागिरीत गावठी बॉम्ब सापडले, परिसरात खळबळ

Source link

Nitesh Ranenitesh rane writes letter to cmनितेश राणेनितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Comments (0)
Add Comment