महालक्ष्मी रेसकोर्सवरुन आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा, म्हणाले घटनाबाह्य सरकार…..

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘घटनाबाह्य सरकार महालक्ष्मी येथील रेसकोर्स बिल्डरांना विकायला निघाले आहे. मात्र. तिथे शिवसेना एकही नवी वीट रचू देणार नाही’, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी दिला. मुंबई आणि आसपासचे अनेक प्रकल्प सरकारने रखडवून ठेवले आहेत. त्यांचे उद्घाटन झाले नाही तर ते आम्ही करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

शिवसेनेने गिरगावात शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला हेता. यावेळी स्थानिक खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई उपस्थित होते. मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. यावेळी महालक्ष्मी रेसकोर्स येथील जमीन विकसित करण्याच्या धोरणावर त्यांनी टीका केली. रेसकोर्सवर परिसरातील हजारो नागरिक सकाळ-संध्याकाळ व्यायाम, योगा करण्यासाठी जात असतात. मात्र, २२६ एकरमधील फक्त ९० एकर रेसकोर्ससाठी ठेवून उर्वरित विकासकांना देण्याचा विचार सुरू आहे. हे शिवसेना होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबईकरांना थंडीची अनुभूती, तापमान १७.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले, हवामान खात्याकडून पावसाचा इशारा

दक्षिण मुंबईकडे संपूर्ण देशाचे लक्ष असते. एकेकाळी याठिकाणी सर्व प्रमुख उद्योग, बँक, हिरे व्यापार यांची मुख्यालये होती. मात्र, हळूहळू ती गुजरातला हलविण्यात आली. नुकतेच ज्याचे उद्घाटन झाले त्या डायमंड बुर्सला मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांना धमकावून यायला सांगितले. राज्याला हितकारक ठरतील, असे अनेक प्रकल्प गुजरातला पळविण्यात आले, हा अन्याय किती दिवस सहन करायचा. आमचा गुजरातवर रोष नाही. मात्र. जे आमच्या हक्काचे आहे. ते मिळालेच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

राज्यातील मुख्यमंत्र्यांवर टीका करताना ठाकरे यांनी त्यांची नक्कल केली. कोस्टल रोड, शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू हे प्रकल्प आधीच खुले होण्याची गरज होती. उरण रेल्वे रखडलेली आहे, दिघा रेल्वे स्थानकही तयार आहे. मात्र, उद्घाटन होत नाही. रविवारी स्थानकाला भेट देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच गुजरातच्या बुलेट ट्रेनला फुकट जमीन देणारे सरकार सर्वसामान्य जनतेला सागरी पूल वापरण्यासाठी २५० रुपयांचा टोल लावते, अशी टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या काळात अनेक घोटाळे झाले असून, आमचे सरकारवर आल्यावर ते सगळे जेलमध्ये जातील, असा इशाराही त्यांनी दिला.

सध्या ५०, १०० वर्षे जुने वाद उकरून काढून त्यात समाज, जातींमध्ये भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. मतदान करताना कोण तुमच्या भविष्याबद्दल बोलतेय, विचार करतेय हे पाहा. महाविकास आघाडी आणि आता इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न करत असून सर्वांनी त्याला साथ द्या, असे आवाहनही यावेळी त्यांनी मतदारांना केले.

‘घटनेच्या बाजूने निकाल अपेक्षित’

शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवर १० जानेवारीला विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय अपेक्षित आहे. विधानसभा अध्यक्षांकडून न्यायाची अपेक्षा आहे. त्यांनी जर संविधानाच्या बाजूने निकाल दिला तर विजय आपलाच आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या सरकारचे ‘सत्तामेव जयते’ हे ब्रीद या असून जे विरोधात जातील, त्यांच्यावर रोहित पवार यांच्याप्रमाणे छापे टाकण्यात येतात’, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मनात आहे ते बाहेर येतं, भरत गोगावलेंचं बाळासाहेबांवरील खळबळजनक वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Source link

aditya thackerayDevendra FadnavisEknath Shindemahalaxami racecourceshivsena ubtआदित्य ठाकरेएकनाथ शिंदेमहालक्ष्मी रेसकोर्समुंबई न्यूजशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
Comments (0)
Add Comment