दौंड: चारित्र्यावर संशय घेत पत्नीला उसाच्या शेतात नेऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मलठण येथे शनिवारी पहाटे घडली आहे. गौरी उर्फ सुमन राहुल लोंढे (३५ ) असे या पीडित पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी पती राहुल विष्णू लोंढे याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी गौरी या पती राहुलसोबत शनिवारी पहाटे सहाच्या सुमारास काम करण्यासाठी गेल्या होत्या. शेतात कांदा लागवडीचे काम चालू होते. कांदा लागवडीचे काम झाल्यावर सकाळी ११च्या सुमारास पती राहुलने ऊसाला पाणी द्यायचे आहे, असे म्हणून उसाच्या शेताकडे गेल्यावर पती राहुलने काही समजायच्या आत त्याच्या जवळील पिशवीत आणलेले पेट्रोल पत्नी गौरीच्या अंगावर टाकले. नंतर तिला उसात ढकलून तिच्या अंगावर काडीपेटीची काडी पेटवून टाकली. काही क्षणातच आगीच्या भडक्याने साडीने पेट घेतला. यातून सावरत बाहेर आल्यावर पुन्हा पतीने तिला शेतात ढकलले. तेव्हा त्या ठिकाणी ऊस पेटलेला होता.

पेटलेल्या उसात ढकलल्याने ती पुन्हा ओरडत ओरडत रस्त्याच्या कडेने पळाली. आसपासचे लोक जमा झाल्याने त्यांच्या मदतीने तिला उपचारासाठी दौंड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथून पुन्हा पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पती राहुल हा पत्नी गौरी तिच्यावर सतत चारित्र्याचा संशय घेऊन भांडत असत. शनिवारी राहुलने पत्नी गौरीला जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पती राहुल लोंढे यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत राहुल यालाही भाजले आहे. त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. सदर घटनेचा तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी करत आहे.