हायलाइट्स:
- गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ३६० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
- गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४ हजार ३१३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
- आज राज्यात एकूण ९२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई: राज्यात कालच्या तुलनेत आज करोना बाधितांच्या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली झाल्याने एकीकडे चिंताजनक स्थिती आहे. मात्र असे असले तरी करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट झाली आहे. तसेच कालच्या तुलनेत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या देखील थोडी घट झाल्याने राज्याला दिलासाही मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ४ हजार ३१३ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ४ हजार ३४२ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ४ हजार ३६० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ४ हजार ७५५ इतकी होती. तर, आज ९२ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ५५ इतकी होती.
आज राज्यात झालेल्या ९२ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६२ लाख ८६ हजार ३४५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतके झाले आहे.
क्लिक करा आणि वाचा- हृदयद्रावक! मुंबईच्या मुलीचा तुंगार्ली धरणात बुडून मृत्यू
राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या किंचित घटली
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५० हजार ४६६ वर आली आहे. काल ही संख्या ५० हजार ६०७ वर होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा वाढून तो १४ हजार ९७३ वर गेला आहे. ठाणे जिल्ह्यातही ही संख्या वाढून ती ७ हजार १०३ वर आली आहे. त्या खालोखाल साताऱ्यात ही संख्या ६ हजार ००७ इतकी खाली आली आहे. अहमदनगरमध्ये ही संख्या ४ हजार ९३७ वर घसरली आहे. तर, सांगलीत एकूण ३ हजार २४४ इतकी वाढली आहे. तसेच, सोलापुरात ही संख्या २ हजार ६७६ वर खाली आली आहे.
क्लिक करा आणि वाचा- ओबीसी आरक्षण: …तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यावर सर्वपक्षीय सहमती
मुंबईत उपचार घेत आहेत ३,८४५ रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ती ३ हजार ८४५ इतकी वाढली आहे. तर, रत्नागिरीत १ हजार ०५४, सिंधुदुर्गात ९०२, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ७१७ इतकी आहे.
वाशिम जिल्ह्यात फक्त एक सक्रिय रुग्ण
या बरोबरच, औरंगाबादमध्ये ४३८, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ६४ वर खाली आली आहे. अमरावतीत ही संख्या ९४ वर खाली आली आहे. तर राज्यात सर्वात कमी रुग्णसंख्या वाशिम जिल्हयात आहे. येथे फक्त १ सक्रिय रुग्ण आहे.
क्लिक करा आणि वाचा- राणेंच्या टीकेनंतर आता नितेश राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
२,९८,०९८ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ४४ लाख ८७ हजार ९५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ७७ हजार ९८७ (११.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९८ हजार ०९८ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार ९५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.