Cattle Smuggling: धक्कादायक! तस्करीसाठी ते मुक्या जनावरांना गुपचूप देत होते भुलीचे इंजेक्शन

हायलाइट्स:

  • गो तस्करांनी गाई आणि वासरांची तस्करी करण्यासाठी दिले भुलीचे इंजेक्शन.
  • काही ठिकाणी या तस्करांनी गाई-वासरांना पावात भुलीचे औषध टाकून दिले खायला.
  • लोणावळ्यातील कुसगाव बुद्रुक भागात ही घटना सीसीटीव्हीत कैद.

म.टा.प्रतिनिधी, लोणावळा

लोणावळ्या जवळील कुसगाव बुद्रुक येथील ओळकाईवाडी येथे शिंदे हॉस्पिटलजवळ रात्रीच्या सुमारास विश्रांती घेत असलेल्या गाई व वासरांना काही गो तस्करांनी पावामध्ये भुलीचे औषध टाकून जनावरांना पाव खायला देऊन तसेच भुलीचे इंजेक्शन देऊन गाई वासरांना बेशुद्ध करून त्यांना स्कॉर्पिओ गाडी व इतर गाड्यांमध्ये निर्दयीपणे कत्तलीसाठी भरुन नेण्याचा प्रकार येथील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेमुळे गोप्रेमी व गोपालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी कुसगाव बुद्रुक परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या बेवारस जनावरांची संख्या घटली होती. यामुळे ह्या घटत्या संख्येमागे जनावरांची तस्करी होत असल्याचे या घटनेतील सीसीटीव्हीच्या पुराव्यांमुळे स्पष्ट झाले आहे. (the cow smugglers were secretly givin injection of anesthesia to smuggle cattle in lonavala of pune)

या घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर व ग्रामीण परिसर हिंदू समिती, स्थानिक कार्यकर्ते व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. तसेच या घटनेतील सीसीटीव्हीत कैद झालेले चित्रण पुरावे गोळा करून या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- हृदयद्रावक! मुंबईच्या मुलीचा लोणावळ्यातील तुंगार्ली धरणात बुडून मृत्यू

या प्रकारामुळे हिंदु समाज्याच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे दुसरा कोणताही असा अनुचित प्रकार घडू नये यासाठी संबंधित गुन्हेगारांना त्वरीत अटक करण्यात यावे असे निवेदन विश्व हिंदु परिषद, बजरंग दल मावळ, वारकरी संप्रादय व हिंदु समिती लोणावळा यांच्या वतीने तहसिलदार मावळ, आमदार सुनिल शेळके तसेच लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन व शहर पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे. हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण परिसर व बजंरग दलाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे.

क्लिक करा आणि वाचा- राणेंच्या टीकेनंतर आता नितेश राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
क्लिक करा आणि वाचा- संजय राऊत यांना सगळं कळतं, ते जगाचे नेते आहेत; चंद्रकांत पाटील यांचा टोला

Source link

anesthesiacatlesCattle smugglinginjection of anesthesialonavalaभुलीचे इंजेक्शनलोणावळा
Comments (0)
Add Comment