पीएमपीचे शहरात सात ठिकाणी खासगी चार्जिंग स्टेशन; स्टेशन उभारणीचे काम सुरू, वाचा सविस्तर

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) सात ठिकाणी खासगी वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. अदानी ग्रुपकडून पीएमपीच्या सात ठिकाणच्या जागेत ही चार्जिंग स्टेशन उभारली जाणार असून त्या जागांची पाहणी झाली आहे. या चार्जिंग स्टेशनमधून पीएमपीला ३२.५ टक्के रक्कम मिळणार आहे. हिंजवडी फेज टू येथे पहिले खासगी चार्जिंग स्टेशन उभारणीच्या कामाला सुरूवात झाली आहे.
दिघा स्थानकासाठी आदित्य ठाकरे मैदानात; राज्य सरकारवर जोरदार टीका, म्हणाले – जनतेचे नाही तर खोकेदारांचे अच्छे दिन
पीएमपीच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात स्वतःच्या मालकीच्या जागा आहेत. या दोन्ही शहरात पीएमपीकडून १७५० बसच्या माध्यमातून सार्वजनिक बस सेवा दिली जाते. त्यामधून दिवसाला साधारण ११ ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात. पीएमपीला दिवसाला सरासरी एक कोटी ६० लाखांच्या जवळ उत्पन्न मिळते. तरीही पीएमपीला खर्च जास्त येत असल्यामुळे संचालन तूट वाढ आहे. त्यामुळे पीएमपीकडून तिकीटाबरोबरच इतर ठिकाणाहून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न पीएमपी प्रशासन करत आहे. त्यासाठी त्यांच्या काही जागा व्यावसायिक दृष्टीकोनातून विकसित केल्या जात आहेत. तर, काही ठिकाणी नागरिकांसाठी चार्जिंग स्टेशन उभी करून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पीएमपीने पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सात ठिकाणी पहिल्या टप्प्यात खासगी नागरिकांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या चार्जिंग स्टेशनसाठी आदानी ग्रुप सोबत करार करण्यात आला आहे. या चार्जिंग स्टेशन मागविण्यात आलेल्या निविदेमध्ये सर्वाधिक रक्कम आदानी ग्रुप देणार असल्यामुळे त्यांची निवड करून करार करण्यात आला आहे. त्यानुसार सात ठिकाणच्या जागेची आदानी ग्रुपने पाहणी केली असून हिंजवडी फेज टू येथे चार्जिंग स्टेशन उभारणीच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात आली आहे. या चार्जिंग स्टेशनमधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ३२.५ टक्के रक्कम पीएमपीला मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच पीएमपीच्या उत्पन्नाला हातभार लागणार आहे.

शेतकरी पुत्र राजकारणात उतरला, राजकारणातून कारखानदारीकडे वळला, मराठवाड्यातला अग्रेसर कारखानदार झाला

या सात ठिकाणांचा समावेश :
हिंजवडी फेज टू, भक्ती-शक्ती (निगडी), भोसरी, कात्रज, बाणेर-सुस रोड, पुलगेट, डेक्कन जिमखाना अशा सात ठिकाणी इ-वाहनासाठी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहे. या ठिकाणी इलेक्ट्रिक दुचाकी, चारचारी आणि तीन चारी वाहनांना चोवीस तास चार्जिंग करण्याची सोय राहणार आहे. यासाठी पीएमपी आणि आदानी ग्रुप यांचे ऍप जोडले जाणार आहे.

Source link

pmp newsprivate charging stationsprivate charging stations of pmpPune newsखासगी चार्जिंग स्टेशनपीएमपी खासगी चार्जिंग स्टेशनपीएमपी बातमीपुणे बातमी
Comments (0)
Add Comment